प्रकरण १
स्वाध्याय

प्रश्न १. अ) योग्य पर्याय निवडा :
१. अर्थशास्त्राची शाखा, जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे.
  अ) सूक्ष्म अर्थशास्त्र   ब) स्थूल अर्थशास्त्र
  क) अर्थमिती   ड) यापैकी काहीही नाही.
उत्तर : फक्त अ (सूक्ष्म अर्थशास्त्र)
२. सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना.
  अ) राष्ट्रीय उत्पन्न   ब) सामान्य किंमत पातळी
  क) घटक किंमत   ड) उत्पादन किंमत
उत्तर : क व ड   (घटक किंमत , उत्पादन किंमत)
३. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत.
  अ) राशी पध्दत   ब) समग्र पध्दत
  क) विभाजन पध्दत   ड) सर्व समावेशक पध्दत
उत्तर : क) विभाजन पध्दत
४) स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते.

  अ) संपूर्ण अर्थव्यवस्था   ब) आर्थिक विकास 
  क) एकूण पुरवठा   ड) उत्पादन किंमत
उत्तर : अ,ब,क

५) सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती

  अ) वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत

  ब) आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत

  क) सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत

  ड) उत्पन्न व रोजगार सिद्धांत

पर्याय : १) फक्त अ    

       २) अ,ब,क

       ३) ब,क,ड

       ४) अ,क,ड

उत्तर : १) फक्त अ

६) स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित विधान ……..

 अ) स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते.

 ब) स्थूल अर्थशास्त्र विशिष्ट घटकावर आधारित.

 क) स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्यांच्या  कार्यपद्धतीशी संबंधित

 ड) स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र

पर्याय : १) अ,ब,क,ड     २) अ,ब,क

       ३) ब,क,ड       ४) अ,क,ड

उत्तर : ४) अ,क,ड
प्रश्न १ ब) सहसंबंध पूर्ण करा.
१.   सूक्ष्म अर्थशास्त्र : विभाजन पध्दत :: स्थूल अर्थशास्त्र : राशी पध्दत
२. सूक्ष्म अर्थशास्त्र  : झाड       :: स्थूल अर्थशास्त्र     : जंगल
३. स्थूल अर्थशास्त्र  : उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत :: सूक्ष्म         अर्थशास्त्र      :      किंमत सिद्धांत
४. मॅक्रोस : स्थूल अर्थशास्त्र :: मायक्रोस : सूक्ष्म अर्थशास्त्र
५. सर्व साधारण समतोल : स्थूल अर्थशास्त्र :: आंशिक समतोल :     सूक्ष्म अर्थशास्त्र 
प्रश्न १ क) विधान व तर्क प्रश्न :
१)  विधान (अ)  : सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा उपयोग करते.

  

तर्क विधान (ब) : विभाजन पद्धत म्हणजे एका घटकाचा                    अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास होय.

पर्याय :१) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

      २) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.

      ३) दोन्ही विधाने सत्य असून, विधान ‘ब’ विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

      ४) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ विधान ‘अ’ चे योग्य  स्पष्टीकरण नाही.

उत्तर : विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.


२) विधान (अ) : स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो.

  तर्क विधान (ब) : पण वस्तूची किंमत निश्चिती व उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचा अभ्यास असतो.

 पर्याय :१) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

   २) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.

   ३) दोन्ही विधाने सत्य असून, विधान ‘ब’ विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

   ४) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

उत्तर : दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

३) विधान (अ) : सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो.

 तर्क विधान (ब) : स्थूल अर्थशास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जातो.

पर्याय :१) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

 २) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.

 ३) दोन्ही विधाने सत्य असून, विधान ‘ब’ विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

 ४) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

उत्तर : दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही. 

४) विधान (अ) : सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय.

  तर्क विधान (ब) : आंशिक समतोलात एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इ. वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते.

 पर्याय :१) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

 २) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.

 ३) दोन्ही विधाने सत्य असून, विधान ‘ब’ विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण करते.

 ४) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

उत्तर : दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण करते. 


५) विधान (अ) : सूक्ष्म अर्थशास्त्रात उत्पन्न व रोजगार सिद्धांत यांचे विश्लेषण करते.

  तर्क विधान (ब) : स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे.

पर्याय :१) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

२) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.

३) दोन्ही विधाने सत्य असून, विधान ‘ब’ विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण करते.

४) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

उत्तर : विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.


६) विधान (अ) : स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किमतीचे विश्लेषण करते.

  तर्क विधान (ब) : स्थूल अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा अभ्यास केला जातो.

पर्याय :१) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

 २) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.

 ३) दोन्ही विधाने सत्य असून, विधान ‘ब’ विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण करते.

 ४) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

उत्तर : विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

प्रश्न १. ड) आर्थिक पारिभाषिक शब्द सूचवा.

१) अर्थव्यवस्थेची अशी शाखा जी अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे.

उत्तर : सूक्ष्म अर्थशास्त्र

२) अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किंमतीची सरासरी ….. 

उत्तर : सर्व साधारण किंमत पातळी

३) लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे.

उत्तर : एकूण आर्थिक कार्यक्षमता                                                 


प्रश्न १ इ) विसंगत शब्द ओळखा :

१) सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्टे : किंमत सिद्धांत, विभाजन पद्धत, राशी पद्धत, मर्यादित व्याप्ती.

उत्तर : राशी पद्धत

२) स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती : उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्व साधारण किंमत सिद्धांत व भाववाढ, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत 

उत्तर : उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत    

प्रश्न १ ई) विधाने पूर्ण करा.

१) आर्थिक कल्याणाचे सिद्धांत प्रामुख्याने ………

    अ) साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे.

    ब) उत्पादन घटकाशी संबंधित आहे.

    क) वस्तूच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे.

    ड) उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेशी संबंधित आहे.

उत्तर : उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेशी संबंधित आहे.

२) स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची शाखा ……….

    अ) अंशतः अर्थशास्त्राचे विश्लेषण करते.   

    ब) संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते.

    क) मिश्र अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते.    

    ड) राजकीय अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते.

उत्तर : संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते.



प्रश्न २. खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना

      ओळखून ती स्पष्ट करा.

१.गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती

 गोळा केली.

उत्तर : संकल्पना : वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास  .

१)   सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब , विशिष्ट उत्पादन संस्था,

   वैयक्तिक उत्पन्न,विशिष्ट वस्तूंची किंमत इ. लहान किंवा

   वैयक्तिक आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला

   जातो.

२)  वरील उदाहरणातही गौरीने एका विशिष्ट उद्योगातील

   वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली असल्याने हा

   वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास आहे.

२. रमेशने उत्पादनविषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे

  ठरविले. उदा. काय आणि कसे उत्पादन करावे ?

उत्तर : संकल्पना : मुक्त बाजार अर्थव्यवस्था .

१)   मुक्त बाजार अर्थव्यवस्था अशी असते की ,

   ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते , कसे,

   किती उत्पादन करावे यांसारखे आर्थिक निर्णय

   खाजगी पातळीवर घेतले जातात.

२)   वरील उदाहरणातही रमेशने उत्पादन विषयक

   काय आणि कसे उत्पादन करावे हे सर्व निर्णय

   स्वतः घेण्याचे ठरविल्याने त्यातून मुक्त बाजार

   अर्थव्यवस्था ही संकल्पना स्पष्ट होते.

३. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना

 वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले.

उत्तर : संकल्पना : उत्पादन घटकाचे मोबदले  .

१) जे घटक उत्पादन कार्यामध्ये वापरले जातात त्यांना

  उत्पादन घटक म्हटले जाते. भूमी ,श्रम ,भांडवल व

  संयोजक या चार उत्पादन घटकांच्या किंमती किंवा

  त्यांचे मोबदले म्हणजेच अनुक्रमे खंड, वेतन, व्याज, व 

  नफा होय.

२) वरील उदा. वेतन व व्याज दिले आहे जे की उत्पादन 

  घटकांचे मोबदले आहेत.

प्रश्न २. ब) फरक स्पष्ट करा.

१)   विभाजन पद्धत व राशी पद्धत :

अ.क्र.

विभाजन पद्धत

राशी पद्धत

१. अर्थ

संपूर्ण अर्थव्यवस्थेचे लहानात लहान आर्थिक घटकांमध्ये विभाजन करून त्यांचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे वापरली जाणारी पद्धत म्हणजे विभाजन पद्धत होय.

संपूर्ण अर्थव्यवस्थेतील लहानात लहान आर्थिक घटकांच्या बेरजेच्या स्वरूपातील एकूण परिमाणाचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राद्वारे वापरली जाणारी पद्धत म्हणजे राशी पद्धत होय.

२ स्वरूप

आर्थिक चलांच्या व्यक्तिगत परिमाणांच्या अभ्यासासाठी विभाजन पद्धतीचा वापर केला जातो.

आर्थिक चलांच्या समुच्चयात्मक परिमाणांच्या अभ्यासासाठी राशी पद्धतीचा वापर केला जातो. 



२) आंशिक समतोल आणि सर्वसाधारण समतोल : 


अ.क्र.

आंशिक समतोल

सर्वसाधारण समतोल

१. अर्थ

सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकाचा समतोल स्पष्ट करणारा समतोलाचा प्रकार म्हणजे आंशिक समतोल होय.

स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समतोल स्पष्ट करणारा समतोलाचा प्रकार म्हणजे सर्वसाधारण समतोल होय.

२. स्वरूप

आंशिक समतोलात इतर परिस्थिती कायम असल्याचे गृहीत मानून आर्थिक चलांमध्ये परस्परावलंबन नसल्याचे गृहीत धरले जाते.

सर्वसाधारण समतोलात सर्व घटक इतर सर्व घटकांशी संबंधित असल्याचे गृहीत मानून आर्थिक चलांमध्ये परस्परावलंबन असल्याचे गृहीत धरले जाते.


प्रश्न ३ खालील प्रश्नाची उत्तरे लिहा.

१) सूक्ष्म अर्थशास्त्राची  वैशिष्टे स्पष्ट करा.

उत्तर : सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्टे  :-

सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्टे पुढीलप्रमाणे 

१) वैयक्तिक घटकांचा अभ्यास . २) किंमत सिद्धान्त .

३) आंशिक समतोल.      ४) विशिष्ट गृहीतकांवर आधारित .

५) विभाजन पध्दतीचा वापर .    ६) सीमांत तत्त्वाचा वापर .

७) बाजार रचनांचे विश्लेषण .     ८) मर्यादित व्याप्ती .

सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्टे :-

१) वैयक्तिक घटकांचा अभ्यास : सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब , विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट वस्तूंची किंमत इ. लहान किंवा वैयक्तिक आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो.
२)   किंमत सिद्धान्त : सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या , तसेच उत्पादन घटकांच्या किंमती कशा ठरतात याचाच अभ्यास केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत म्हणतात .
३)   आंशिक समतोल : आंशिक समतोलात एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इ. वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पध्दतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो.
४) विशिष्ट गृहीतकांवर आधारित : सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण हे पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इ. गृहीतांवर आधारित असते. परंतु वास्तवात अशी परिस्थिती आढळत नाही. या शाखेतील सर्व विवेचन इतर परिस्थिती कायम या गृहीतावर आधारित आहेत. या गृहीतामुळे सिद्धांताचे विवेचन सोपे होते.
५) विभाजन पध्दत : सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे, तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पध्दतीचा वापर केला जातो. उदा. समग्र मागणीतील वैयक्तिक मागणीचा अभ्यास.
६) सीमांत तत्त्वाचा वापर : सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विश्लेषणाचे साधन म्हणून सीमांत तत्त्वाचा वापर केला जातो. एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल म्हणजे सीमांत परिमाण होय. सीमांत तत्त्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम, उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो.
७)  बाजार रचनांचे विश्लेषण : पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकारी, मक्तेदारीयुक्त स्पर्धा इ. विविध बाजार रचनांचे विश्लेषण करून, निरनिराळ्या बाजारात वस्तूच्या किंमती व उत्पादनाचे परिमाण कसे निश्चित होते याचे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते.
८)  मर्यादित व्याप्ती : सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास यात होत नाही. राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांची चर्चा होत नाही. उदा. बेरोजगारी, भाववाढ, मंदी, दारिद्र्य, व्यवहारतोलाची स्थिती, आर्थिक वाढ इ. प्रश्नांची चर्चा यात होत नाही. त्यामुळे या शाखेची व्याप्ती मर्यादित आहे.
     अशा प्रकारे वरीलप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्टे आहेत. जी अतिशय महत्वाची आहेत. यावरून सूक्ष्म अर्थशास्त्र माहित होते.

२)स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. 

उत्तर :  स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती  :-
        स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पुढीलप्रमाणे आहेत.
१)उत्पन्न व रोजगार सिद्धान्त :- 
२) सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धान्त :-
३) आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत :-
४) विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत :-
१) उत्पन्न व रोजगार सिद्धान्त :-
    स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार यांची कारणे स्पष्ट करते, रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. व्यावसायातील बदलाचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे.
२) सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धान्त :-
       स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते व त्यामध्ये कोणत्या कारणांनी चढ उतार होतात याचे विवेचन केले जाते. भाववाढ व आर्थिक मंदी यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
३) आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत :
     स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी आणि विकासासंबंधी सिद्धांताचा समावेश होतो. यात दारिद्र्य आणि मागासलेपणा यांचे कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते.
४) विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत :
   स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत, एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी  निगडीत आहे.

३) स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा .
उत्तर : स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व  :-
१)अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती  :
    स्थूल आर्थिक विश्लेषण आर्थिक व्यवस्थेच्या कार्य पध्दतीची माहिती देते. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास उपयुक्त ठरते.
२)आर्थिक चढउतार :
      उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगारातील चढउतारांची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्याची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल आर्थिक विश्लेषण उपयोगी ठरते.
    ३) राष्ट्रीय उत्पन्न :
         स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे महत्व समोर आले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरण मांडता येत नाही. 
   ४) आर्थिक विकास  : स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अभ्यासामुळे दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इ. समस्या समजण्यास मदत होते. ते आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत करते.
 ५)अर्थव्यवस्थेची कामगिरी : संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो.
 ६) स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास : आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न, उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यांसारख्या आर्थिक चलांशी सबंधित आहेत. यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास उपयुक्त ठरतो.

प्रश्न ४ खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात सकारण स्पष्ट करा.
१) सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे.
उत्तर : या विधानाशी मी असहमत आहे.
कारण : १) सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमती , वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूचा अभ्यास यासारख्या लहान आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो.
२)  सूक्ष्म अर्थशास्त्रात बेकारी, दारिद्र्य, उत्पनाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचाही अभ्यास केला जात नाही. या शाखेत आर्थिक वृधींचे सिद्धांत, व्यापारचक्रांचे सिद्धांत, मौद्रिक व राज्यवित्तीय धोरणे इ. चा अभ्यास या शाखेच्या कक्षे बाहेर आहे.
३)  सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा प्रमुख अभ्यासविषय हा किंमत सिद्धान्त व साधनसामग्रीचे वाटप हा आहे. या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिमाणाचा अभ्यास केला जात नाही. या शाखेत आर्थिक वृधींचे सिद्धांत, व्यापारचक्रांचे सिद्धांत, मौद्रिक व राज्यवित्तीय धोरणे इ. चा अभ्यास या शाखेच्या कक्षे बाहेर आहे. त्यामुळे समग्रलक्षी अर्थशास्त्रापेक्षा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. 

२) स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो.
उत्तर : या विधानाशी मी असहमत आहे.  
कारण : १) स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या सर्वसाधारण पातळीवरील एकूण आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. उदा. एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण मागणी,एकूण पुरवठा, सर्वसाधारण किंमत पातळी इ. स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकांचा अभ्यास करते.
२)    स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न व रोजगार सिद्धांत किंवा उत्पन्न विश्लेषण म्हणूनही ओळखले जाते.
३)   स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणाशी येत नाही.तर परीमाणाच्या एकूणाशी  येतो, वैयक्तिक उत्पन्नाशी येत नाही, तर राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो, वैयक्तिक  किंमतीशी येत नाही,तर किंमत पातळीशी येतो आणि वैयक्तिक उत्पादनाशी येत नाही तर राष्ट्रीय उत्पादनाशी येतो.
      म्हणून वरील विधानाशी मी असहमत आहे.

३) स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे.
उत्तर : या विधानाशी मी सहमत आहे .  
कारण : १) स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की, ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाचा व त्यांच्यातील परस्परसंबंधाचा विचार करण्यात येतो.
     तर विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमती , वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय.
२)  स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार यांची कारणे स्पष्ट करते, रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो.
     तर सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक वस्तूंच्या किंमती वस्तूची मागणी व पुरवठा या दोन शक्तीने ठरते . सूक्ष्म अर्थशास्त्र मागणी व पुरवठा विश्लेषणाशी संबंधीत आहे. ते वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन आणि वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन म्हणजे वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी संबंधीत आहे.
३)  स्थूल अर्थशास्त्रात राशी पध्दतीचा वापर केला जातो. तर सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पध्दतीचा वापर केला जातो.
      म्हणून वरील विधानाशी मी सहमत आहे.

४) सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पध्दतीचा वापर केला जातो.
उत्तर : या विधानाशी मी सहमत आहे .
कारण :१) विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमती , वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय.
२)  सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे, तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पध्दतीचा वापर केला जातो.
३)  उदा. समग्र मागणीतील वैयक्तिक मागणीचा अभ्यास.
      म्हणून वरील विधानाशी मी सहमत आहे.

५) सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते.
उत्तर : या विधानाशी मी असहमत आहे .
कारण : १) सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जात नाही तर स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत म्हणले जाते. 
२)    स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना , त्याचे विविध घटक, मापन पध्दती आणि सामाजिक लेखांकनांचा अभ्यास करते. ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे.
३)  राष्ट्रीय उत्पन्नाची व एकूण रोजगार पातळी कशी निश्चित होते आणि  त्यात बदल किंवा चढउतार कोणत्या कारणांनी घडून येतो याचे विवेचन करणारे आहे.
       म्हणून वरील विधानाशी मी असहमत आहे.


प्रश्न ५ सविस्तर उत्तरे लिहा.
१) सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा .
उत्तर : सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व  :-
१)    किंमत निर्धारण : वस्तू व सेवा आणि उत्पादन घटकांच्या किंमती कशा ठरतात याचे स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते. तसेच निरनिराळ्या वस्तू व सेवा आणि उत्पादन घटकांच्या किंमती वेगवेगळ्या का असतात या शाखेच्या अभ्यासाने होते.
२)    मुक्त बाजार अर्थव्यवस्था : मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे कार्य आपोआप कसे चालते हे समजण्यासाठी सूक्ष्म आर्थिक सिद्धांत उपयोगी आहेत.
३)   विदेशी व्यापार : सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही दोन देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे, यांसारख्या विदेशी व्यापारातील विविध पेलुंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते.
४) आर्थिक प्रारुपांची निर्मिती : सूक्ष्म अर्थशास्त्राने निर्माण केलेली साधी प्रारूपे,   अर्थव्यवस्थेतील गुंतागुंतीची आर्थिक परिस्थिती समजण्यास मदत करतात. अनेक   संकल्पना, आर्थिक परिभाषा, विश्लेषणाची साधने यांचा विकास करून अर्थशास्त्राला   मौलिक स्वरूप प्राप्त करून देण्यात या शाखेचे योगदान मोलाचे आहे.
५) व्यावसायिक निर्णय : व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म   आर्थिक सिद्धांत मदत करतात . या निर्णयात उत्पादन खर्चाची निश्चिती, वस्तूंची   किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा इ. चा समावेश होतो.
६) शासनास उपयुक्त : आर्थिक धोरणे आखण्यासाठी सरकारला सूक्ष्म आर्थिक   विश्लेषणाचा उपयोग होतो. करविषयक धोरण, सार्वजनिक खर्चविषयक धोरण,   किंमतविषयक धोरण, साधनांच्या कार्यक्षम वाटपासंबंधी धोरण इ. धोरणे   आखण्यासाठी हे विश्लेषण सरकारला मार्गदर्शन करते.
७) कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार : सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर   करून महत्तम कल्याणाचे उद्दिष्टे कसे साधता येते याचेही विवेचन ही शाखा करते. 


२) स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्टयासह स्पष्ट करा.
उत्तर : स्थूल अर्थशास्त्र : स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की, ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न या सारख्या मोठ्या समुच्चयाचा व त्यांच्यातील परस्परसंबंधाचा विचार करण्यात येतो.
प्रा. जे.एल.हॅन्सन  :- “ स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की, ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न या सारख्या मोठ्या समुच्चयाचा व त्यांच्यातील परस्परसंबंधाचा विचार करण्यात येतो.”
स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्टे :-
१)     समग्र घटकांचा अभ्यास :  स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील मोठ्या आर्थिक घटकांचा उदा. राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण मागणी,एकूण पुरवठा, एकूण उपभोग इ. समग्र घटकांचा अभ्यास केला जातो.
२)    उत्पन्न सिद्धांत : स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना , त्याचे विविध घटक, मापन पध्दती आणि सामाजिक लेखांकनांचा अभ्यास करते. ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची व एकूण रोजगार पातळी कशी निश्चित होते आणि  त्यात बदल किंवा चढउतार कोणत्या कारणांनी घडून येतो याचे विवेचन करणारे आहे.  
३)  सर्व साधारण समतोलाचे विश्लेषण : स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपध्दतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल, संपूर्ण अर्थव्यवस्था विचारात घेत असल्याने एकूण मागणी व एकूण पुरवठा यात समतोल कसा साधला जातो. तसेच किंमतीशी निगडीत अभ्यास करतो.
४)  परस्परावलंबन : स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले उदा. एकूण रोजगार,राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण गुंतवणूक, किंमत पातळी इ. आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदा. गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम, उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो.
५)  राशी पध्दत : राशी पध्दतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्रा. बोल्डींग यांच्या मते, “ जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो, परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्टे दिसून येत नाहीत.” यातून सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र यातील फरक दर्शविला जातो.
६)  वृद्धीचे प्रारूपे : स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीचे प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते . आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात. विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदा. मुलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे महालनोबीस वृद्धी प्रारूप.
७) सर्व साधारण किंमत पातळी  : स्थूल अर्थशास्त्रात सर्व साधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. सर्व साधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्य परिस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किंमतीची सरासरी होय.
८)  धोरणाभिमुख  : लॉंर्ड केन्स यांच्या मते, “ स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे.” उदा. भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे इत्यादी.
   अशाप्रकारे वरीलप्रमाणे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्टे आहेत.
                                                       ***
Exam Google Form Quiz Link 



Share