स्वाध्याय
प्रकरण - ३ (ब)मागणीची लवचिकता
प्र. १. योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा.
१) रेषीय मागणी वक्रावरील ‘क्ष’ अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता ___________ .
अ) शून्य ब) एक क) अनंत ड) एक पेक्षा कमी
उत्तर : रेषीय मागणी वक्रावरील ‘क्ष’ अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता शून्य .
२) रेषीय मागणी वक्रावरील ‘य’ अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता ___________ .
अ) शून्य ब) एक क) अनंत ड) एक पेक्षा जास्त
उत्तर : रेषीय मागणी वक्रावरील ‘क्ष’ अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता अनंत .
३) ‘क्ष’ अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र _________ .
अ) संपूर्ण लवचिक मागणी ब) संपूर्ण अलवचिक मागणी
क) जास्त लवचिक मागणी ड) कमी लवचिक मागणी
उत्तर : ‘क्ष’ अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र संपूर्ण लवचिक मागणी.
४) किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते , तेव्हा असणारा मागणी वक्र _____________ .
अ) पसरट ब) तीव्र उताराचा क) आयताकृती परिवलयाचा ड) समांतर
उत्तर : किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते , तेव्हा असणारा मागणी वक्र पसरट .
५) Ed = ० हा अनुभव येणाऱ्या वस्तू ___________ .
अ) सुखसोयीच्या ब) सर्वसाधारण क) जीवनावश्यक ड) अत्यावश्यक
उत्तर : Ed = ० हा अनुभव येणाऱ्या वस्तू जीवनावश्यक .
६) औषधांची मागणी ________ .
अ) जास्त लवचीक ब) संपूर्ण लवचीक
क) कमी लवचीक ड) एकक लवचीक
उत्तर : औषधांची मागणी कमी लवचीक .
प्र. २. विसंगत शब्द ओळखा.
१) अंडी , भाजीपाला , फळे , औषधे .
२) धुलाईयंत्र , खुर्ची , दुध , कपाट.
३) संगणक , दूरदर्शन , रेडीओ , मीठ .
उत्तर : १) औषधे , २) दुध , ३) मीठ
प्र. ३. सहसंबंध पूर्ण करा.
१) संपूर्ण लवचीक मागणी वक्र : Ed =
: :
: Ed = ०
उत्तर : संपूर्ण अलवचीक मागणी वक्र
२) परिवलयाचा मागणी वक्र :
: : क्ष अक्षाकडे झुकणारा तीव्र उताराचा मागणी वक्र : कमी लवचीक मागणी .
उत्तर : एकक लवचीक
३) सरळ रेषेतील मागणी वक्र : लिनिअर मागणी वक्र : :
: अरेखीय मागणी वक्र .
उत्तर : वक्राकार मागणी वक्र .
४) पेन व शाई :
: : चहा व कॉफी : पर्यायी वस्तू .
उत्तर : पूरक वस्तू
प्र. ४ योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा :
१) फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल.
उत्तर : मागणीची उत्पन्न लवचीकता
२) एका वस्तूच्या किंमतीतील बदलाचा अन्य वस्तूंच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम.
उत्तर : मागणीची छेदक लवचीकता
३) किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल .
उत्तर : मागणीची किंमत लवचीकता
४) मागणीतील अनंत बदलामुळे होणारी लवचीकता .
उत्तर : मागणीची संपूर्ण लवचीकता
५) किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणाइतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवणारी लवचीकता .
उत्तर : मागणीची एकक लवचीकता
प्र. ४. विधान आणि तर्क प्रश्न :
१. विधान ‘अ’ : एक चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते.
तर्क विधान ‘ब’ : मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकांतील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शविते.
पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.
ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.
क) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
ड) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
उत्तर : क) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
२) विधान ‘अ’ : एका वस्तूच्या किंमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो.
तर्क विधान ‘ब’ : उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो.
पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.
ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.
क) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
ड) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
उत्तर : ड) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
३) विधान ‘अ’ : कमी लवचिकतेमध्ये किंमतीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते.
तर्क विधान ‘ब’ : किंमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते.
पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.
ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.
क) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
ड) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
उत्तर : क) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
प्र. ५ . फरक स्पष्ट करा :
१) अधिक लवचीक मागणी आणि कमी लवचीक मागणी
अ.क्र. | अधिक लवचीक मागणी | कमी लवचीक मागणी |
१ . अर्थ | किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते, तेव्हा त्याला अधिक लवचीक मागणी असे म्हणतात. | जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते, तेव्हा त्याला कमी लवचीक मागणी असे म्हणतात. |
२. मूल्य | येथे मागणीची लवचिकता एका पेक्षा जास्त असते. | येथे मागणीची लवचिकता एका पेक्षा कमी असते. |
३. वक्राचा उतार | अधिक लवचीक मागणी या प्रकारात मागणी वक्र पसरट असतो. | कमी लवचीक मागणी या प्रकारात मागणी वक्र तीव्र उताराचा असतो. |
२) संपूर्ण लवचीक मागणी आणि संपूर्ण अलवचीक मागणी
अ.क्र. | संपूर्ण लवचीक मागणी | संपूर्ण अलवचीक मागणी |
१ . अर्थ | किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो. तेव्हा त्याला संपूर्ण लवचीक मागणी असे म्हणतात. | किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही, तेव्हा त्याला संपूर्ण अलवचीक मागणी असे म्हणतात. |
२. मूल्य | येथे मागणीची लवचिकता अनंत असते. | येथे मागणीची लवचिकता शून्य असते. |
३. वक्राचा उतार | संपूर्ण लवचीक मागणी या प्रकारात मागणी वक्र क्ष अक्षाला समांतर असतो. | संपूर्ण अलवचीक मागणी या प्रकारात मागणी वक्र य अक्षाला समांतर असतो. |
प्र.६. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
१) मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत स्पष्ट करा.
उत्तर : एकूण खर्च पद्धत :
एकूण खर्च पद्धत प्रा. मार्शल यांनी विकसित केली आहे. मूळ किंमतीला वस्तूंवर येणारा खर्च व बदललेल्या किमतीला होणारा खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजता येते. एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार होय.
एकूण खर्च = किंमत X मागणी
या संदर्भात मार्शल यांनी खालील संकल्पना स्पष्ट केल्या आहेत.
अ) जास्त लवचीक मागणी : जेव्हा वस्तूच्या किंमतीतील बदलामुळे एकूण खर्चात वाढ होते, तेव्हा ती जास्त लवचीक मागणी असते.
मागणीची लवचिकता > १. येथे मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असते.
ब) एकक लवचीक मागणी : जेव्हा किंमत कमी होते किंवा वाढते , एकूण खर्चात बदल होत नाही किंवा स्थिर राहते.
मागणीची लवचिकता = १. येथे मागणीची लवचिकता एक असते.
क) कमी लवचीक मागणी : किंमतीतील बदलामुळे एकूण खर्चात घट होते, तेव्हा ती कमी लवचीक मागणी असते.
मागणीची लवचिकता < १. येथे मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी असते.
एकूण खर्च पद्धत खालील उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करता येईल .
किंमत | मागणी नग | एकूण खर्च | मागणी लवचिकता | |
अ | १० | ६ | ६० | एकापेक्षा जास्त |
२० | ५ | १०० | ||
आ | ३० | ४ | १२० | एकक |
४० | ३ | १२० | ||
इ | ५० | २ | १०० | एका पेक्षा कमी |
६० | १ | ६० | ||
वरील तक्त्या मध्ये उदा. ‘अ’ मध्ये मूळ किंमत १० रुपये तर मूळ मागणी ‘६’ नग आहे. म्हणजे वस्तूवर ६० रुपये एवढा एकूण खर्च होतो. जेव्हा किंमत २० रुपये पर्यंत वाढते, तेव्हा मागणी ५ नगापर्यंत कमी होते व १०० रुपये एवढा एकूण खर्च होतो. हा एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा जास्त असल्याने मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे.(Ed > १) म्हणजे ही जास्त लवचीक मागणी आहे.
वरील तक्त्या मध्ये उदा. ‘ब’ मध्ये मूळ किंमत ३० रुपये तर मूळ मागणी ‘४’ नग आहे. म्हणजे वस्तूवर १२० रुपये एवढा एकूण खर्च होतो. जेव्हा किंमत ४० रुपये पर्यंत वाढते, तेव्हा मागणी ३ नगापर्यंत कमी होते व १२० रुपये एवढा एकूण खर्च होतो. हा एकूण खर्च मूळ खर्चाएवढा असल्याने मागणी एकक लवचीक आहे.(Ed = १) म्हणजे ही एकक लवचीक मागणी आहे.
वरील तक्त्या मध्ये उदा. ‘क’ मध्ये मूळ किंमत ५० रुपये तर मूळ मागणी ‘२’ नग आहे. म्हणजे वस्तूवर १०० रुपये एवढा एकूण खर्च होतो. जेव्हा किंमत ६० रुपये पर्यंत वाढते, तेव्हा मागणी १ नगापर्यंत कमी होते व ६० रुपये एवढा एकूण खर्च होतो. हा एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा कमी असल्याने मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी आहे.(Ed <१) म्हणजे ही कमी लवचीक मागणी आहे.
अशा प्रकारे मागणीची लवचिकता खर्च पद्धतीच्या साहाय्याने मोजता येते.
२) मागणीची लवचिकता म्हणजे काय ? मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा.
उत्तर : मागणीची लवचिकता :
एका चलातील बदलाचा दुसऱ्या चलावर होणारे परिणाम लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करतात.
डॉ. मार्शल यांच्या मते, “ ज्या प्रमाणात किंमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते, यालाच मागणीची लवचिकता म्हणतात.”
मागणीच्या लवचिकतेचे प्रकार :
(१) उत्पन्न लवचिकता
(२) छेदक लवचिकता
(३) किंमत लवचिकता
१) उत्पन्न लवचिकता :
उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. उत्पन्नाव्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे अन्य घटक स्थिर असतात.
मागणीतील शेकडा बदल
मागणीची उत्पन्न लवचिकता = _____________________
उत्पन्नातील शेकडा बदल
सूत्र रूपाने :-
% ⃤⃤ म
मागणीची लवचिकता = __________
% ⃤ य
२) छेदक लवचिकता :
छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किंमतीतील बदलाचा अन्य (पर्यायी व पूरक) वस्तूंच्या मागणीत घडून येणारा बदल होय.
अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल
मागणीची छेदक लवचिकता = ____________________________
ब वस्तूच्या किंमतीतील शेकडा बदल
सूत्र रूपाने :
% ⃤ मअ
मागणीची छेदक लवचिकता = __________
% ⃤ किब
⃤⃤ मअ कब
= ----------- X ---------
मअ ⃤ कअ
३) किंमत लवचिकता :
डॉ. मार्शल यांच्या मते, “ किंमतीतील प्रमाणित बदलांमुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात.”
मागणीतील शेकडा बदल
मागणीची किंमत लवचिकता = -------------------------------
किंमतीतील शेकडा बदल
सूत्ररूपाने :
% ⃤⃤ म
मागणीची किंमत लवचिकता = -------------
% ⃤⃤⃤ क
⃤ म क
= ----- X -----
म ⃤⃤ क
Google Form Link : https://forms.gle/akUsPXP1uh9CxXxp8
Share
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.