प्रकरण क्र. ३
  मागणीचे विश्लेषण
    स्वाध्याय 

प्रश्न १. खालील विधाने पूर्ण करा.

१) पर्यायी वस्तूंची किंमत आणि मागणी यांत ………… 

अ) प्रत्यक्ष संबंध असतो.       ब) व्यस्त संबंध असतो.

क) कोणताही बदल नाही.    ड)प्रत्यक्ष आणि व्यस्त                                                          संबंध असतो.
उत्तर : प्रत्यक्ष संबंध असतो.
२) हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत उत्पन्न     व मागणी यांत …………
अ) प्रत्यक्ष संबंध असतो.      ब) व्यस्त संबंध असतो.
क) कोणताही बदल नाही.   ड)प्रत्यक्ष आणि व्यस्त                                                          संबंध असतो.
उत्तर : व्यस्त संबंध असतो.
३. मागणी व किंमत यांचा फलनसंबंध      खालील सूत्राने असा ………….
  अ) Dx = f (Px)            ब) Dx = f (P४)
  क) Dx = f (y)              ड) Dx =  (Tx)
उत्तर : अ) Dx = f (Px)
४. जेव्हा अधिक किमतीला कमी नगसंख्येला मागणी केली जाते, हे असे दर्शविते की, …………..
अ) मागणीतील वृद्धी   ब) मागणीतील विस्तार
क) मागणीतील ऱ्हास  ड) मागणीतील संकोच
उत्तर : ड) मागणीतील संकोच
५. कार व इंधन यांची ………. मागणी असते.
 अ) प्रत्यक्ष  ब) अप्रत्यक्ष  क) पूरक  ड) संमिश्र
उत्तर : क) पूरक    
प्रश्न २. योग्य पारिभाषिक शब्द सुचवा :
१)अशी परिस्थिती, जेथे कमी किमतीत अधिक प्रमाणात मागणी केली जाते………..
उत्तर : मागणीचा विस्तार
२) मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण ………..
उत्तर : मागणी वक्र
३. अशी वस्तू, जी अनेक उपयोगांसाठी वापरली जाते…………….
उत्तर : विविधोपयोगी / अनेक उपयोगी वस्तू
४. किंमत स्थिर असताना इतर घटकांतील बदलाचा परिणाम   म्हणून जेव्हा मागणी वाढते …………...

उत्तर : मागणीतील वाढ / वृद्धी
५. अशी इच्छा, जीला खरेदीशक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते ………..
उत्तर : मागणी
६. हलक्या दर्जाच्या वस्तू …….
उत्तर : गिफेनच्या वस्तू   

प्रश्न ३. फरक स्पष्ट करा.
१) इच्छा आणि मागणी

इच्छा
मागणी
१. अर्थ
एखादी वस्तू हवीहवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय.
खरेदीशक्तीचे पाठबळ व पैसे खर्च करण्याची मानसिक तयारी यांचे पाठबळ असणारी इच्छा म्हणजे मागणी होय.
२. किंमत, स्थळ, काळ      यांच्याशी संबंध
किंमत, स्थळ आणि 
काळ या घटकांशी इच्छेचा संबंध नसतो.
किंमत, स्थळ आणि काळ या घटकांशी मागणीचा संबंध असतो.

२) मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच 
मागणीतील विस्तार
मागणीतील संकोच  
१. अर्थ
इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता, वस्तूची किंमत कमी झाल्याने मागणीत वाढ होते, तेव्हा त्यास मागणीतील विस्तार असे म्हणतात.
इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता, वस्तूची  किंमतीत वाढ झाल्याने मागणीत घट होते, तेव्हा त्यास मागणीतील संकोच असे म्हणतात.
२.समतोल बिंदू       

 मागणीतील विस्तारात   किंमत   व मागणीचा नवीन   समतोल बिंदू त्याच मागणी   वक्रावर खाली सरकतो.
मागणीतील संकोचात किंमत व मागणीचा नवीन समतोल बिंदू त्याच मागणी वक्रावर वर  सरकतो.


३) मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास
मागणीतील वृद्धी
मागणीतील ऱ्हास
१. अर्थ

इतर परिस्थितीत अनुकूल  बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत वाढ होते, तेव्हा त्यास मागणीतील वृद्धी असे म्हणतात.
इतर परिस्थितीत प्रतिकूल  बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत घट होते, तेव्हा त्यास मागणीतील ऱ्हास असे म्हणतात.
२. वक्राचे स्थानांतर        

जेव्हा मागणीत वृद्धी होते तेव्हा मागणीतील वृद्धी दर्शविणारा मागणी वक्र  मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतरीत होतो.
जेव्हा मागणीत वृद्धी होते तेव्हा मागणीतील ऱ्हास दर्शविणारा मागणी वक्र मूळ मागणी वक्राच्या डावीकडे स्थानांतरीत होतो.





प्रश्न ४. खालील विधानांशी तुम्ही सहमत की             असहमत ते सकारण स्पष्ट करा :
१.मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो.
उत्तर : या विधानाशी मी सहमत आहे.
सकारण : १) डॉ. आल्फ्रेड मार्शल यांनी स्पष्ट केलेल्या मागणी नियमानुसार,“ इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते.”


२) मागणी नियमाचे हे विधान पुढील आकृती द्वारे स्पष्ट करता येते.
 आकृतीमध्ये ‘क्ष’ अक्षावर वस्तूची मागणी आणि ‘य’ अक्षावर किंमत दर्शविली आहे. आकृतीत ‘मम’ हा मागणी वक्र आहे. जो डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो. म्हणजे मागणी वक्राचा आकार ऋणात्मक असतो. कारण हा वक्र किंमत आणि मागणीचा व्यस्त संबंध दर्शवितो.
३) घटती सीमांत उपयोगिता, उत्पन्न परिणाम, पर्यायता परिणाम, वस्तूचे विविध उपयोग, नवीन ग्राहकवर्ग इ. कारणांमुळे मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो.
२. मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक   आहे .
उत्तर : या विधानाशी मी असहमत आहे.
सकारण : १) मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक नसून पुढील घटक ही मागणी निर्धारित करतात.
२)  उत्पन्न :
  उपभोक्त्यांच्या उत्पन्नाचा खरेदीशक्तीवर परिणाम होतो. उत्पन्नात वाढ झाल्यास मागणी वाढते तर उत्पन्न कमी झाल्यास मागणी कमी होते. मागणी हि उपभोक्त्याच्या उत्पन्नावर अवलंबून असते.
3) लोकसंख्येचे आकारमान :
  वस्तूची मागणी लोकसंख्येवर अवलंबून असते. लोकसंख्या जेवढी जास्त तेवढी वस्तूची मागणी जास्त असते. जर लोकसंख्या कमी असेल तर वस्तूची मागणी कमी असते.
४) वस्तूचे स्वरूप  :
  जर एखाद्या वस्तूचा उपभोग अत्यावश्यक व टाळता येण्यासारखा नसेल तर त्या वस्तूची मागणी किंमतीशी निगडीत न राहता स्थिर राहील. उदा. रक्तदाब नियंत्रणाचे औषध, मीठ इ.
  अशा प्रकारे मागणी निर्धारित करणारे विविध घटक आहेत.
३. जेव्हा गिफेन वस्तूंची किंमत कमी होते, तेव्हा त्याची      मागणी वाढते.
उत्तर : या विधानाशी मी असहमत आहे.
सकारण : १) सर रॉबर्ट गिफेन यांनी हलक्या दर्जाच्या वस्तूंची किंमत कमी झाल्यास त्यांची मागणी जास्त न होता कमी होत असल्याचे स्पष्ट केले.
२)गिफेनच्या वस्तूंची किंमत कमी झाल्यास व्यक्तीच्या वास्तव उत्पन्नात वाढ होते. त्यातून चांगल्या उच्च प्रतीच्या वस्तूची मागणी केली जाते.
३)उदा. पावाची किंमत कमी झाल्यास मांसच्या मागणीत वाढ होते. यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात. 

प्रश्न ५. १) खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा  :





वस्तूची
किंमत
 (र)



वस्तूची मागणी (किलो)
                  

            बाजार                    

            मागणी        (किलो)     अ+ब+क
      उपभो क्त   
'अ'
                            उपभोक्ता 'ब'
         उपभोक्ता 'क'
२५
  १६
     १५
    १२
३०
   १२
     ११
    १०
३५
   १०
      ९
     ८
४०
   ८
     ६
     ४
अ) बाजार मागणी पत्रक पूर्ण करा.
उत्तर :
 वस्तूची किंमत (र)
 वस्तूची मागणी (किलो)
बाजार मागणी  (किलो)       अ+ब+क
उपभोक्ता  'अ'
उपभोक्ता 'ब'
उपभोक्ता 'क'
२५
१६
१५
१२
४३
३०
१२
११
१०
३३
३५
१०
९
८
२७
४०
८
६
४
१८

२) खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची   उत्तरे द्या.


१)उजवीकडे स्थानांतरीत होणारा मागणी वक्र.

उत्तर :  मागणीतील वृद्धी
२) डावीकडे स्थानांतरीत होणारा मागणी वक्र.
उत्तर :  मागणीतील ऱ्हास
३) वस्तूची किंमत
 उत्तर : अक
४) मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास   संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर :
मागणीतील वृद्धी : “इतर परिस्थितीत अनुकूल  बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत वाढ होते, तेव्हा त्यास मागणीतील वृद्धी असे म्हणतात.”

मागणीतील ऱ्हास : “इतर परिस्थितीत प्रतिकूल  बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत घट होते, तेव्हा त्यास मागणीतील ऱ्हास असे म्हणतात.”
३)खालील आकृतीचे स्पष्टीकरण करा .




     ‘अ’
१)‘अ’ या आकृतीत मागणीतील …… दर्शविला आहे.
उत्तर : संकोच
२) ‘अ’ या आकृतीत मागणी वक्र ……. च्या दिशेने सरकतो.
उत्तर : उजवीकडून डावीकडे खालून वरच्या दिशेला सरकतो.
                       ‘ब’
१)‘ब’ या आकृतीत मागणीतील ….. दर्शविला आहे.
उत्तर : विस्तार
२) ‘ब’ या आकृतीत मागणी वक्र ……. च्या दिशेने सरकतो.
उत्तर : डावीकडे उजवीकडून वरून खालच्या  दिशेला सरकतो.
प्रश्न ६. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा :
१) मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. 
मागणीचा नियम :

प्रस्तावना :
    डॉ. आल्फ्रेड मार्शल यांनी १८९० साली प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या “अर्थशास्त्राची मूलतत्वे” (Principles Of Economics) या ग्रंथात मागणीचा नियम स्पष्ट केला. मागणीचा नियम किंमत व मागणी यांतील परस्पर संबंध स्पष्ट करतो. 
नियमाचे विधान :
      डॉ. आल्फ्रेड मार्शल यांच्या मते, “ इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते.”
           थोडक्यात, इतर परिस्थिती कायम असताना, वस्तूच्या किंमतीत वाढ होते तेव्हा वस्तूच्या मागणीत घट होते आणि जेव्हा वस्तूच्या किंमतीत घट होते तेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते.

      अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा म्हणजेच परस्परविरोधी असतो.
  मागणी नियमाद्वारे मागणी व किंमत यांचा फलनसंबंध खालील प्रकारे स्पष्ट करता येतो.  
 Dx = f (Px)
येथे, D = वस्तूची मागणी
x = वस्तू
f = फलनPx = वस्तूची किंमत 

गृहीतके :
मागणीचा नियम खालील गृहीतकांवर आधारित आहे.
१) उपभोक्त्याची उत्पन्नपातळी स्थिर असते.
२) लोकसंख्येच्या आकारमानात बदल होत नाही.
३) पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती असतात.
४) पूरक वस्तूंच्या स्थिर किमती असतात.
५) भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही.
६) आवडीनिवडी,सवयी,प्राधान्य,फॅशन्स इत्यादींमध्ये बदल होत नाही. 
    खालील उदाहरणाच्या साहाय्याने मागणीचा नियम कोष्टक व आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केला आहे.
‘क्ष’ वस्तूची किंमत (र)
‘क्ष’ वस्तूची मागणी (किलो)
५०
१
४०
२
३०
३
२०
४
१०
५
कोष्टकात दर्शविल्याप्रमाणे, जेव्हा ‘क्ष’ वस्तूची किंमत प्रतिकिलोस ५० रु. असते, तेव्हा मागणी १ किलो आहे. परंतु जेव्हा किंमत ५० रु.वरून ४० रु.पर्यंत कमी होते, तेव्हा मागणी १ किलोवरून २ किलोपर्यंत वाढते. ज्या वेळेस वस्तूची किंमत ३० रु.पर्यंत असते, तेव्हा मागणी ३ किलो होते. त्याचप्रमाणे किंमत २० रु.पर्यंत प्रति किलो असताना ४ किलो मागणी केली जाते आणि किंमत १० रु.पर्यंत घटते तेव्हा मागणी ५ किलोपर्यंत वाढते. यावरून असे स्पष्ट होते की, जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणीत वाढ होते आणि वस्तूंची किंमत वाढते तेव्हा मागणीत घट होते. म्हणजेच किंमत व मागणी यांत व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. 
    वरिल आकृतीमध्ये ‘क्ष’ अक्षावर वस्तूची मागणी आणि ‘य’ अक्षावर किंमत दर्शविली आहे. आकृतीत ‘मम’ हा मागणी वक्र आहे. जो डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो. म्हणजे मागणी वक्राचा आकार ऋणात्मक असतो. कारण हा वक्र किंमत आणि मागणीचा व्यस्त संबंध दर्शवितो.

मागणी नियमाचे  अपवाद खालीलप्रमाणे आहेत.
१. गिफेनचा विरोधाभास : 
   कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू होय. गिफेन वस्तूच्या किमती कमी झाल्या तरी त्यांच्या मागणीत वाढ होत नाही. अशा वेळी जेव्हा वस्तूची किंमत कमी होते, तेव्हा त्या वस्तूची मागणी कमी होते. सर रॉबर्ट गिफेन यांनी इंग्लंडमध्ये पाव व मांस ह्यांच्या मागणीशी निगडीत निरीक्षण केले जेंव्हा पावाची किंमत कमी होते तेव्हा व्यक्ती त्याची कमी खरेदी करतात. कारण त्याची खरेदीशक्ती आणि वास्तव उत्पन्नात वाढ होते आणि त्याऐवजी ते उच्च दर्जाच्या वस्तू  उदा. मांस खरेदी करण्यास प्राधान्य देतात, यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात.  
२. प्रतिष्ठेच्या वस्तू :
    मौल्यवान वस्तू जसे, हिरे, सोने, इत्यादी प्रतीष्ठादर्शक वस्तू आहेत. म्हणून श्रीमंत व्यक्ती अशा वस्तूंच्या किमतीत वाढ झाली तरीही अधिक वस्तू खरेदी करतात.  
३. किंमतीचा आभास :
   अनेक वेळा उपभोक्त्यांना असे वाटते की, जास्त किमतीच्या वस्तू चांगल्या दर्जाच्या असतात आणि म्हणून या वस्तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. उदा. उच्च दर्जाच्या वस्तू 
४. भविष्यकालीन किमतीचा अंदाज :
     जेव्हा लोकांना भविष्यात वस्तूंच्या किंमती वाढतील असा अंदाज असेल, तेव्हा हा मागणीचा नियम खरा ठरणार नाही. अशा परिस्थितीत, वस्तूंच्या किंमती वाढत असताना देखील उपभोक्ते अधिक मागणी करतात. उदा. दिवाळीच्या अगोदर साखर, तेल इ. वस्तूच्या किंमती वाढत असल्या तरी उपभोक्ते वाढत्या किमतीला मागणी करतात. कारण दिवाळीत वस्तूच्या किंमती अधिक वाढण्याची शक्यता असते.
५. अज्ञान :
    काही वेळेस व्यक्ती अज्ञानामुळे अधिक किंमत असतानाही वस्तू खरेदी करतात. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा उपभोक्त्याला इतर ठिकाणी त्या वस्तूंवरील किमतीबद्दल माहिती नसते.

२) मागणीचे निर्धारक सविस्तर स्पष्ट करा.
उत्तर : मागणी निर्धारित करणारे घटक :
            वस्तूंची मागणी निर्धारित करणारे घटक खालीलप्रमाणे
1) किंमत :
        उपभोक्ते जेव्हा वस्तूंची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्तू खरेदी करतात आणि जेव्हा वस्तूंची किंमत अधिक असते तेव्हा कमी प्रमाणात वस्तू खरेदी करतात.
2)  उत्पन्न :
        उपभोक्त्यांच्या उत्पन्नाचा खरेदीशक्तीवर परिणाम होतो. उत्पन्नात वाढ झाल्यास मागणी वाढते तर उत्पन्न कमी झाल्यास मागणी कमी होते. मागणी हि उपभोक्त्याच्या उत्पन्नावर अवलंबून असते. 
3) लोकसंख्येचे आकारमान :
        वस्तूची मागणी लोकसंख्येवर अवलंबून असते. लोकसंख्या जेवढी जास्त तेवढी वस्तूची मागणी जास्त असते. जर लोकसंख्या कमी असेल तर वस्तूची मागणी कमी असते.
4) पर्यायी वस्तूंच्या किंमती  :
          जर कमी किंमतीत वस्तूला पर्याय उपलब्ध असल्यास तर व्यक्ती महाग वस्तूपेक्षा स्वस्त पर्यायी वस्तूंची मागणी करतो. उदा. चहाच्या किंमतीत वाढ झाल्यास व्यक्ती कॉफी ची मागणी करतो.
5) पूरक वस्तूंच्या किंमती :
        एका वस्तूच्या किंमतीत झालेल्या बदलाचा परिणाम इतर वस्तूंच्या मागणीवर होतो. उदा. कार आणि इंधन. जर इंधनाची किंमत वाढली तर कारची मागणी कमी होईल.
6) वस्तूचे स्वरूप  :
    जर एखाद्या वस्तूचा उपभोग अत्यावश्यक व टाळता येण्यासारखा नसेल तर त्या वस्तूची मागणी किंमतीशी निगडीत न राहता स्थिर राहील. उदा. रक्तदाब नियंत्रणाचे औषध, मीठ इ.
7) जाहिरात :
    जाहिरात, विक्री प्रोत्साहन योजना आणि प्रभावी विक्री कौशल्य ग्राहकांच्या आवडी निवडीत बदल घडवून आणतात व अनेक वस्तूंची मागणी निर्माण करतात. उदा. टूथपेस्ट , साबण इ.
८) आवडीनिवडी, सवयी व फॅशन्स  :
   उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, सवयी यांचा  मागणीवर प्रभाव पडतो. उदा. जीन्सची आवड चहाची सवय इ. 
९) भविष्यकालीन किंमतीचा अंदाज  :
  जर वस्तूची किंमत भविष्यात कमी होईल असा उपभोक्त्याचा अंदाज असेल तर सद्यस्थितीला उपभोक्ता त्या वस्तूची कमी मागणी करेल. त्याचप्रमाणे भविष्यात वस्तूच्या किंमती वाढणार असा अंदाज असेल तर सद्य स्थितीला उपभोक्ता त्या वस्तूची अधिक मागणी करेल .
१०) कररचना  :
  सरकारच्या कररचनेचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. वस्तू व सेवांवर जास्त कर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत वाढून मागणी कमी होईल. याउलट वस्तू व सेवांवर कमी कर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत कमी होऊन मागणी वाढेल .
१२) इतर घटक  :
    नैसर्गिक परिस्थिती , तंत्रज्ञानातील बदल , सरकारी धोरण , रूढी परंपरा इत्यादीतील बदलांचा परिणाम मागणीवर होतो.
  अशा प्रकारे वरीलप्रमाणे मागणी निर्धारित करणारे घटक आहेत.   

३) मागणीचे प्रकार स्पष्ट करा.
उत्तर : मागणीचे पाच प्रकार आहेत ते खालीलप्रमाणे
1) प्रत्यक्ष मागणी :-
  प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी उपभोक्त्यांकडून ज्या वस्तूंना मागणी केली जाते, त्याला प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात.
     ज्या वस्तू उपभोक्त्यांच्या गरजा प्रत्यक्ष भागवितात. अशा उपभोग्य वस्तूंसाठी मागणी केली जाते.   उदा. अन्नाची मागणी, कपडे इत्यादी.
2) अप्रत्यक्ष मागणी :-
  अप्रत्यक्ष मागणीला परोक्ष मागणी असेही  म्हणतात. ज्या वस्तूंची मागणी उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनासाठी केली जाते, तेंव्हा अशा वस्तूंच्या मागणीला अप्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. ही मागणी उत्पादन घटकांची असते.
उदा. कारखान्यातील कामगारांची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते .
3) पूरक मागणी :-
  जेव्हां एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तूबरोबर केली जाते, तेव्हा त्यास पूरक मागणी असे म्हणतात. पूरक मागणीलाच संयुक्त मागणी असेही  म्हणतात. एखादी गरज भागविण्यासाठी जेंव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त वस्तूंची मागणी एकत्रित केली जाते. तेंव्हा पूरक मागणी अस्तित्वात येते.
उदा. शाईपेन आणि शाईची मागणी, कार आणि इंधनाची मागणी  .
4) संमिश्र मागणी :-
  एका वस्तूची मागणी अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी केली जाते, तेव्हा त्यास संमिश्र मागणी असे म्हणतात.
उदा. विजेची मागणी. याची मागणी वेगवेगळ्या उपयोगांसाठी जसे, विद्युत दिवे, पंखा, एअर कंडीशनर, धुलाई यंत्र इत्यादीसाठी केली जाते .
5) स्पर्धात्मक मागणी :-
  एकमेकांना पर्याय असणाऱ्या वस्तूची मागणी म्हणजे स्पर्धात्मक मागणी होय.
 उदा. चहा व कॉफी , साखर व गूळ इत्यादी .
अशा प्रकारे वरीलप्रमाणे मागणीचे पाच प्रकार आहेत.



Share