प्रकरण क्र. २
उपयोगिता विश्लेषण
स्वाध्याय
प्रश्न १ अ) खालील विधाने पूर्ण करा.
१)
घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात आल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता
……….
अ)
वाढते ब) स्थिर राहते
क)
घटते ड) वाढते आणि नंतर घटते
उत्तर : ब) स्थिर राहते
२) घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची
संकल्पना
………
अ) क्रमवाचक संकल्पना
ब) संख्यात्मक संकल्पना
क) क्रमवाचक संकल्पना व संख्यात्मक संकल्पना दोन्हीही
ड) यांपैकी नाही
उत्तर :
ब) संख्यात्मक संकल्पना
३) जेव्हा सीमांत
उपयोगिता ऋण होते, तेव्हा एकूण उपयोगिता ………
अ) वाढते ब) स्थिर
असते क)
घटते ड)
शून्य असते
उत्तर : क)
घटते
४) घटत्या सीमांत
उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा (तृप्ती) बिंदू म्हणजे जेव्हा ……..
अ) एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते
ब) एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता ऋण
होते
क) एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते
ड)
सीमांत उपयोगिता घटते आणि एकूण उपयोगिता वाढते .
उत्तर : क) एकूण उपयोगिता महत्तम
होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते.
५) घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत
उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता ………
अ) वाढते ब)
घटते
क) बदलत नाही ड)
महत्तम होते
उत्तर : अ) वाढते
६) वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगिता
म्हणजे …..
अ) एकूण
उपयोगिता ब) सीमांत उपयोगिता
क) सरासरी
उपयोगिता ड) शून्य उपयोगिता
उत्तर :ब) सीमांत उपयोगिता
प्रश्न १ ब) योग्य जोडीचा पर्याय निवडा :
१) अ ब
१) काळ
उपयोगिता अ) वाहतूक
२) स्थल उपयोगिता ब) रक्त पेढी
३) सेवा उपयोगिता क) मोबाईल फोन
४) ज्ञान उपयोगिता ड) डॉक्टर
पर्याय : अ) १-ड, २-ब, ३-अ, ४-क
ब) १-ब,
२-अ, ३-ड, ४-क
क) १-अ,
२-ब, ३-क, ४-ड
ड) १-ब, २-क, ३-ड, ४-अ
उत्तर
: ब) १-ब, २-अ, ३-ड, ४-क
२.
उपभोक्त्याचा समतोल दर्शविणारे विधान ……..
अ) सीमांत उपयोगिता किंमतीपेक्षा जास्त
ब) सीमांत उपयोगिता व किंमती समान
क) सीमांत उपयोगिता किंमतीपेक्षा कमी
ड) किंमत एकापेक्षा कमी
पर्याय : 1) अ आणि ब
2)
अ, ब आणि क
3)
अ, ब, क आणि ड
4)
फक्त ब
उत्तर : 4) फक्त ब
प्रश्न १ क) योग्य पर्याय निवडा.
१. घटत्या
सीमांत उपयोगीतेचे अपवाद
अ) संस्थात्मक साधन ब)
छंद क) कंजूष
व्यक्ती ड) पैसा
पर्याय : १) फक्त अ २)
अ,ब,क ३) ब,क,ड
४) अ,क,ड
उत्तर : ३) ब,क,ड
२. घटत्या सीमांत उपयोगीतेवरची टीका
अ) अवास्तव गृहीतके ब)
अविभाज्य वस्तूसाठी लागू पडत नाही
क) हा सिद्धांत विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून
मिळणाऱ्या समाधाना पुरता मर्यादित
ड) प्रत्यक्षात उपयोगीतेचे संख्यात्मक मापन करणे अशक्य
असते.
पर्याय : १) फक्त अ २) अ,ब,क
३) ब,क,ड ४) अ,ब,क,ड
उत्तर : ४) अ,ब,क,ड
प्रश्न १ ड) सहसंबंध
पूर्ण करा.
१.
मातीपासून खेळणी : _____ :: लोकरीचे कपडे : स्थल उपयोगिता
उत्तर : रूप उपयोगिता
२.
सर्व नगांच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता : एकूण उपयोगिता :: वाढीव
वस्तूच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता : ___________
उत्तर : सीमांत उपयोगिता
प्रश्न १ इ) आर्थिक
पारिभाषिक शब्द :
१.
वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते.
उत्तर : स्वामित्व उपयोगिता
२.
वस्तूंच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित
उपयोगितेची बेरीज
उत्तर : एकूण
उपयोगिता
प्रश्न १ ई) विधान व तर्क प्रश्न :
१) विधान (अ) : उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
तर्क विधान
(ब) : उपयोगीतेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो.
पर्याय :
अ) विधान ‘अ’
सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’
असत्य आहे.
ब) विधान ‘अ’
असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.
क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे
विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे
विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
उत्तर : दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे
विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
२) विधान (अ) : सीमांत उपयोगितेचा वक्र वर जाणारा असतो.
तर्क विधान
(ब) : एखाद्या वस्तूच्या नगांचा उपयोग जसजसा वाढत जातो तसतशी त्यापासून मिळणारी
सीमांत उपयोगिता घटत जाते.
पर्याय :
अ) विधान ‘अ’
सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’
असत्य आहे.
ब) विधान ‘अ’
असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे
क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे
विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे
विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
उत्तर : विधान ‘अ’
असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’
सत्य आहे.
३) विधान (अ) :
सीमांत उपयोगिता घटत जाते.
तर्क विधान
(ब) : एकूण उपयोगीता घटत्या दराने वाढत जाते.
पर्याय :
अ) विधान ‘अ’
सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’
असत्य आहे.
ब) विधान ‘अ’
असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आह
क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे
विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे
विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
उत्तर : दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे
विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
प्रश्न २ . खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
१) सलमाने
हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले.
उत्तर
: संकल्पना
: काळ उपयोगिता
स्पष्टीकरण
:
१.काळ बदलल्याने
काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते
त्यास
काल उपयोगिता असे
म्हणतात.
२. वरील
उदाहरणात सलमा हिवाळ्यात
स्वेटर खरेदी करत असल्याने त्यातून काल उपयोगिता ही संकल्पना
स्पष्ट होते.
२) निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले.
उत्तर
: संकल्पना
: स्वामित्व उपयोगिता
स्पष्टीकरण
:
१. जेव्हा वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते, तेंव्हा स्वामित्व उपयोगिता निर्माण होते.
२. वरील उदाहरणामध्ये निलेशने त्याच्या बहिणीसाठी सोन्यापासून बनवलेले दागिने खरेदी केल्याने
त्यातून मालकी निलेश कडून त्याच्या बहिणीकडे जाते येथे स्वामित्व उपयोगिता ही संकल्पना स्पष्ट
होते.
३.
कविताने संत्र्यांचे एकामागे एक पाच नग सेवन केले.
उत्तर : संकल्पना
: घटती
सीमांत
उपयोगिता
स्पष्टीकरण
:
१. एखाद्या वस्तूच्या
नगांचा निरंतर उपभोग जसजसा वाढत जातो,तसतशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत
जाते.
२. वरील उदाहरणामध्ये कविताने
संत्र्यांचे एकामागे एक पाच नग सेवन केले
असल्याने त्यातून घटती सीमांत उपयोगिता स्पष्ट होते.
४.
भूषणने चार चपात्या खाल्या नंतर पाचवी चपाती खाण्यास
नकार दिला.
उत्तर : संकल्पना
: सर्वाधिक समाधान(तृप्ती बिंदू)
स्पष्टीकरण
:
१. जेंव्हा
एकूण
उपयोगिता महत्तम असते तेंव्हा सीमांत उपयोगिता शून्य
होते. ही स्थिती सर्वाधिक समाधानाचा (तृप्ती)बिंदू दर्शविते.
ए.उ. = महत्तम सी.उ. = शून्य
२. सर्वाधिक समाधान मिळाल्यानंतर उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेण्याचे थांबवितो. हेच या उदाहरणात
स्पष्ट होते.
५.
ललीताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली.
उत्तर : संकल्पना
: उपयोगिता
स्पष्टीकरण :
१.वस्तूमध्ये असणारी मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे
उपयोगिता होय.
२.वरील उदाहरणामध्ये ललीताने निबंध लेखनाची गरज पूर्ण करण्याची क्षमता वही व पेनमध्ये आहे. यातून उपयोगितेची संकल्पना
स्पष्ट होते.
प्रश्न २ ब) फरक स्पष्ट करा :
१) उपयोगिता आणि
उपयुक्तता
|
अ.क्र.
|
उपयोगिता
|
उपयुक्तता
|
|
१. अर्थ
|
वस्तूमध्ये असणारी मानवी गरज
भागविण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय.
|
उपयुक्तता म्हणजे वस्तूचे उपयोग
मूल्य होय.
|
|
२.परस्परसंबंध
|
ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते, त्या वस्तूमध्ये
उपयुक्तता असेलच असे नाही.
|
ज्या वस्तूमध्ये उपयुक्तता असते, त्या वस्तूमध्ये निश्चितपणे
उपयोगिता असते.
|
प्रश्न ४.
खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
वस्तूचे नग
|
एकूण उपयोगिता
|
सीमांत उपयोगिता
|
१
|
६
|
६
|
२
|
११
|
५
|
३
|
१५
|
४
|
४
|
१५
|
०
|
५
|
१४
|
-१
|
१. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता
वक्र काढा.
२.
अ) जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत
उपयोगिता शून्य .
ब) जेव्हा
एकूण
उपयोगिता घटते
तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण .
प्रश्न ५.
सविस्तर उत्तरे
लिहा.
१) घटत्या
सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा.
उत्तर
: घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत
प्रस्तावना
:
घटत्या
सीमांत उपयोगितेचा सिद्धांत विवेकी उपभोक्त्याची आर्थिक वर्तणूक स्पष्ट करतो.
सर्वप्रथम हा सिद्धांत प्रा. गॉंसेन यांनी मांडला. म्हणून याला ‘प्रा. गॉंसेनचा
पहिला नियम’ असे म्हटले जाते. परंतु नंतर, प्रा. मार्शल यांनी १८९० साली आपल्या
‘अर्थशास्त्राची मूलतत्वे’ या ग्रंथात हा सिद्धांत विस्तृत स्वरुपात सादर केला.
सिद्धांताचे
विधान :
“ इतर
परिस्थिती स्थिर असताना मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तुच्या साठ्यात वाढ होत
गेल्यास, त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान, त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या
वाढीबरोबर, क्रमशः घटत जाते ”.
थोडक्यात
एखाद्या वस्तूच्या नगांचा निरंतर उपभोग जसजसा वाढत जातो,तसतशी त्यापासून मिळणारी
सीमांत उपयोगिता घटत जाते.
सिद्धांताचे गृहिते
:
१.विवेकशीलता ५. योग्य आकारमान
२.सातत्य ६. स्थिरता
३.एकजिनसीपणा ७. विभाज्यता
४.संख्यात्मक मापन ८. एकच गरज
खालील
तक्त्याच्या
आधारे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करता येतो.
X वस्तूची नगसंख्या
|
सीमांत उपयोगिता
|
१
|
१०
|
२
|
८
|
३
|
६
|
४
|
४
|
५
|
२
|
६
|
०
|
७
|
-२
|
तक्त्यावरून
असे स्पष्ट होते की, एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसजसा वाढत जातो तसतशी
त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते, शून्य व ऋण होत जाते.
घटत्या
सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पुढील
आकृतीच्या सहाय्याने व्यक्त करता येईल
आकृतीचे स्पष्टीकरण :
वरील आकृतीत क्ष अक्षावर वस्तूचे नग आणि य अक्षावर
सीमान्त उपयोगिता दर्शविली आहे. दिलेल्या तक्त्याच्या आधारे सीमान्त उपयोगीतेचे
विविध बिंदू आलेखावर रेखाटून जोडले असता सी.उ. वक्र डावीकडून उजवीकडे खाली सरकतो.
तो असे दर्शवितो की, वस्तूच्या उपभोगात सतत वाढ झाल्यास सीमान्त उपयोगिता घटत
जाते.
जेंव्हा सी.उ. वक्र क्ष अक्षाला स्पर्श करतो
तेव्हा सीमान्त उपयोगिता शून्य होते. हा बिंदू कमाल समाधानाची पातळी दर्शवितो.
याला सर्वाधिक समाधानाचा सर्वोत्तम (तृप्ती) बिंदू असे म्हणतात. या बिन्दुनंतर
वस्तूचा उपभोग घेतल्यास असमाधान मिळते आणि सीमान्त उपयोगिता ऋण होते .
सिद्धांताचे अपवाद :
घटत्या
सीमान्त उपयोगीता सिद्धांताचे अपवाद खालीलप्रमाणे आहेत.
१.छंद
:
पोष्टाची
तिकिटे, दुर्मिळ नाणी, अनमोल चित्रे इ. चा
संग्रह करणे तसेच संगीत ऐकणे, पुस्तकांचे वाचन करणे यांसारख्या छंदांच्या
बाबतीत हा सिद्धांत लागू पडत नाही. कारण त्यांच्या
साठ्यात होणारी वाढ अधिकाधिक आनंद देते त्यामुळे सीमान्त उपयोगिता वाढते. परंतु येथे एकजिनसीपणा
आणि सातत्य या गृहीतकांचे उल्लंघन झाले आहे.
२. कंजुष व्यक्ती :
कंजुष व्यक्तीच्या बाबतीत, प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळते
कारण तो लोभी असतो. अविवेकी असतो.
त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या
वाढीबरोबर पैशाची सीमान्त उपयोगिता वाढते. परंतु येथे
विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झाले आहे.
३. व्यसन :
व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत असे आढळून येते की, मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर
त्याची नशेची पातळी वाढत जाते. त्यामुळे
मद्यपी व्यक्तीची सीमान्त उपयोगिता
वाढल्यासारखे वाटते. खरे तर हा आभास असतो. ही स्थिती
सर्वच व्यसनाच्या बाबतीत लागू होते. मात्र येथे विवेकशीलता
या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे.
४. सत्ता :
व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते तसतशी सत्तेची लालसा वाढते. ती जास्तीत जास्त सत्ता
मिळविण्याचा प्रयत्न करते. परंतु येथे
विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे.
५. पैसा :
पैशाची सीमान्त उपयोगिता कधीही शून्य होत नाही. पैशाच्या
साठ्यात वाढ झाल्यास सीमान्त उपयोगिता वाढत जाते. कारण विविध गरजा भागविण्याकरिता
अनेक वस्तू आणि सेवांची खरेदी करण्यासाठी माध्यम म्हणून पैसा वापरला जातो. म्हणून
पैशाच्या बाबतीत हा सिद्धांत लागू पडत नाही. काही अर्थशास्त्रज्ञाच्या मते हा
सिद्धांत पैशाच्या बाबतीतही लागू होताना दिसतो.
वरील
सर्व जरी सिद्धांताचे अपवाद असले तरी पण त्यात कोणत्या ना कोणत्या गृहीतकांचे
उल्लंघन होत असल्यामुळे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला खऱ्या अर्थाने
अपवाद नाहीत.
***
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.