12 th Economics Internal ABT Test - 20 marks
प्रश्न १ योग्य पर्याय निवडा. ४
१. अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे.
अ) सूक्ष्म अर्थशास्त्र ब) स्थूल अर्थशास्त्र
क) अर्थमिती ड) मोद्रीक अर्थशास्त्र
पर्याय :- १) ब २) अ,ब , क ३) अ ४) वरीलपैकी नाही
उत्तर : ३) अ
२. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद
अ) व्यसन ब) छंद क) कंजूष व्यक्ती ड) पैसा
पर्याय :- १) ब,क, ड २) अ, ब, क ३) अ, क, ड ४) वरील सर्व
उत्तर : ४) वरील सर्व
३. Ed=0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू…..
अ) सुखसोईच्या ब) सर्वसाधारण क) जीवनावश्यक ड) पर्यायी वस्तू
पर्याय :- १) अ आणि क २) फक्त क ३) फक्त ड ४) फक्त ब
उत्तर : २) फक्त क
४. विदेशी व्यापाराचे प्रकार
अ) आयात व्यापार ब) निर्यात व्यापार क) पुनर्निर्यात व्यापार ड) अंतर्गत व्यापार
पर्याय :- १) अ आणि ब २) अ,ब आणि क ३) अ,ब, क आणि ड ४) क आणि ड
उत्तर : २) अ,ब आणि क
प्रश्न क्र. २ विसंगत शब्द ओळखा : ४
१) स्थळानुसार बाजार : स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ,
आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, दीर्घकाळ बाजार
उत्तर : दीर्घकाळ बाजार
२) करेत्तर उत्पन्न : विशेष अधिभार, विशेष कर, वस्तू व सेवा कर, शुल्क
उत्तर : वस्तू व सेवा कर
३) संघटित क्षेत्र : सहकारी बँका, व्यापारी बँका, सावकार, भारतीय रिझर्व्ह बँक
उत्तर : सावकार
४) प्राप्ती संकल्पना : एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, सीमांत प्राप्ती, उत्पादन प्राप्ती
उत्तर : उत्पादन प्राप्ती
प्रश्न क्र. ३. सहसंबंध पूर्ण करा : ४
१) माती पासून खेळणी : रूप उपयोगिता :: लोकरीचे कपडे : स्थल उपयोगिता
२) मागणी वक्र : खाली जाणारा :: पुरवठा वक्र : वर जाणारा
३) मक्तेदारी : मुल्यभेद :: मक्तेदारीयुक्त स्पर्धा : वस्तू भेद
४) मूळ वर्ष
किंमत : P० :: चालू वर्ष किंमत : P1
प्रश्न क्र. ४. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा : ४
१) अर्थशास्त्राची अशी शाखा जी अर्थशास्त्रातील लहान भागाशी संबंधित आहे
उत्तर : सूक्ष्म अर्थशास्त्र
२. वस्तू व सेवांवर लागू केला जाणारा कर.
उत्तर : जी. एस. टी. (वस्तू व सेवा कर)
३. ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या ठेवी.
उत्तर : मुदत ठेवी
४. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी.
उत्तर : व्यवहारतोल
प्रश्न क्र. ५ खाली दिलेल्या घटनांवरून तुमचे मत स्पष्ट करा. ४
१. मक्तेदारीत मूल्यभेद केला जातो. २
२. राष्ट्रीय उत्पन्न मापनात दुहेरी गणनेची समस्या ही अडचण येते. . २
उत्तर : राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारी सर्वांत मोठी अडचण म्हणजे दुहेरी गणना. एखादी वस्तू मध्यम आहे की अंतिम आहे हे निश्चित करणे अवघड असल्यामुळे बऱ्याच वस्तूंची गणना दोनदा होण्याची भीती असते. त्यामुळे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न अनेक पटींनी अधिक दिसते.
Share

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.