प्रकरण क्र. ४ पुरवठा विश्लेषण
स्वाध्याय
प्र. १. खालील विधाने पूर्ण करा :
१) जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशने जातो, तेव्हा त्याचा असणारा उतार .
१) धनात्मक २) ॠणात्मक
३) शून्य
४) प्रथम धनात्मक नतरं
ॠणात्मक असतो
उत्तर : - १) धनात्मक
२) पुरवठा वक्र त्याच वक्रावर वरच्या दिशेने सरकणे
म्हणजेच
१) पुरवठा
संकोच २) पुरवठ्याचा ऱ्हास
३) पुरवठ्याचा
विस्तार ४) पुरवठ्यातील वाढ
उत्तर :- ३) पुरवठ्याचा विस्तार
३) जेव्हा पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या
उजव्या बाजूस सरकतो त्यास म्हणतात.
१) पुरवठा
संकोच २) पुरवठ्याचा
ऱ्हास
३) पुरवठ्याचा
विस्तार ४) पुरवठ्यातील वाढ
उत्तर :- ४) पुरवठ्यातील वाढ
४) इतर परिस्थिती स्थिरअसताना केवळ किंमत कमी
झाल्यामुळे नगसंख्या कमी होणे म्हणजेच
१) पुरवठ्याचा
संकोच २) पुरवठ्याचा
ऱ्हास
३) पुरवठ्याचा
विस्तार ४) पुरवठ्यातील
वाढ
उत्तर :- १) पुरवठ्याचा संकोच
५) एकूण जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण
प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे .
१) एकूण
प्राप्ती २) सीमान्त प्राप्ती
३) सरासरी
प्राप्ती ४) सीमान्त खर्च
उत्तर :- २) सीमान्त प्राप्ती
प्र. २. सहसंबंध पूर्ण करा :
१) पुरवठ्याचा विस्तार : किंमत वाढ : :
पुरवठ्याचा संकोच : किंमत घट /कमी
२)
एकूण प्राप्ती : एकूण नगसंख्या X किंमत : : सरासरी प्राप्ती : एकूण प्राप्ती
एकूण नगसंख्या
३)
एकूण खर्च : एकूण स्थिर खर्च + एकूण बदलता खर्च : : सरासरी खर्च : एकूण खर्च
एकूण नगसंख्या
४) मागणी वक्र : खाली
जाणारा : : पुरवठा वक्र : वर जाणारा
५) किंमत स्थिर : पुरवठ्यातील बदल
: : इतर घटक स्थिर : पुरवठ्याचे विचलन
प्र. ३. योग्य आर्थिक पारिभाषिक
शब्द सुचवा :
१) स्थिर घटकावर केला जाणारा खर्च – स्थिर खर्च
२) प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनाचा खर्च – सरासरी खर्च
३) एका जादा नगसंख्येच्या उत्पादनामुळे एकूण
खर्चात होणारी निव्वळ वाढ. – सीमांत खर्च
४) प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी
प्राप्ती. – सरासरी प्राप्ती
प्र. ४. फरक स्पष्ट करा :
१) १) साठा
आणि पुरवठा
|
अ.क्र. |
साठा |
पुरवठा |
|
१ |
विशिष्ट
कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजेसाठा
होय |
विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो
भाग प्रत्यक्ष बाजारात
विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा असे म्हणता. |
|
२ |
साठा
हा पुरवठ्याचे स्रोत आहे |
पुरवठा ही प्रवाही संकल्पना आह |
२) २) पुरवठ्याचा
विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ
|
अ.क्र. |
पुरवठ्याचा विस्तार |
पुरवठ्यातील
वाढ |
|
१ |
इतर घटक स्थिर असताना
किंमतीत वाढ झाल्यामुळे पुरवठ्यातदेखील वाढ होते, त्यास पुरवठ्याचा विस्तार
असे म्हणतात. |
किंमत स्थिर असताना
इतर घटकांत बदल झाल्यामुळे म्हणजेउत्पादन घटकांच्या किमतीत घट, कराच्या
प्रमाणात घट, तांत्रिक सुधारणा इत्यादींमध्ये अनुकूल बदल
झाल्यामुळेपुरवठा वाढतो, त्यास पुरवठ्यातील वाढ असे म्हणतात |
|
२ |
किंमत वाढल्यामुळे
पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर वरच्या बाजूस सरकतो. |
पुरवठा वक्र मूळ पुरवठा
वक्राच्या उजवीकडे सरकतो. |
|
३ |
आकृती : |
आकृती : |
३) पुरवठ्याचा संकोच आणि पुरवठ्याचा ऱ्हास
|
अ.क्र. |
पुरवठ्याचा
संकोच |
पुरवठ्याचा ऱ्हास |
|
१ |
इतर घटक स्थिर असताना
किंमतीत घट झाल्यामुळे पुरवठ्यात देखील घट होते, त्यास पुरवठ्याचा संकोच
असे म्हणतात. |
स्थिर किंमत असताना
इतर घटकांत प्रतिकूल बदल झाल्यामुळे म्हणजेउत्पादन घटकांच्या किमतीतील वाढ, करांच्या
प्रमाणात वाढ, जुनेउत्पादन तंत्र इत्यादींत बदल झाल्यामुळेपुरवठा
कमी होतो. त्यास पुरवठ्यातील घट असे म्हणतात. |
|
२ |
किंमत वाढल्यामुळे
पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर खालच्या बाजूस सरकतो. |
पुरवठा वक्र मूळ पुरवठा
वक्राच्या डावीकडे सरकतो. |
|
३ |
आकृती : |
आकृती : |
३)
४) सरासरी
खर्च आणि सरासरी प्राप्ती
|
अ.क्र. |
सरासरी खर्च |
सरासरी
प्राप्ती |
|
१ |
सरासरी खर्च म्हणजेच
प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च होय. एकूण खर्चाला एकूण नगसंख्येने
भागल्यास सरासरी खर्च मिळतो |
प्रत्येक
नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम
म्हणजेच सरासरी प्राप्ती होय.एकूण प्राप्तीलाएकूण
नगसंख्येनेभागलेअसता सरासरी प्राप्ती मिळते. |
|
२ |
एकूण नगसंख्या |
एकूण नगसंख्या . |
प्र. ५. खालील पत्रकावरून प्रश्नांची
उत्तरे द्या :
अ) चॉकलेटचे
पुरवठा पत्रक :
|
किंमत |
पुरवठा नगसंख्या |
|
10 |
200 |
|
15 |
|
|
20 |
300 |
|
25 |
350 |
|
30 |
|
|
35 |
|
|
40 |
|
प्रश्न :-
१) वरील
पुरवठा पत्रक पूर्ण करा.
|
किंमत |
पुरवठा नगसंख्या |
|
10 |
200 |
|
15 |
250 |
|
20 |
300 |
|
25 |
350 |
|
30 |
400 |
|
35 |
450 |
|
40 |
500 |
२) वरील
पुरवठा पत्रकाच्या साहाय्याने आकृती काढा आणि वरील आकृतीचे स्पष्टीकरण करा.
३) किंमत
आणि पुरवठा यांतील सहसंबंध स्पष्ट करा.
उत्तर : किंमत व पुरवठा यांच्यात प्रत्यक्ष संबंध आहे.
प्र. ६. खालील प्रश्नांची उत्तरे द्या
:
१) एकूण
खर्च व एकूण प्राप्ती या संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर :-
एकूण खर्च - संयोजकाने
वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकांवर केलेला खर्च म्हणजेच एकूण
खर्च होय.
उत्पादनाच्या
विविध पातळ्यांवर केला जाणारा एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च यांची बेरीज
केल्यास एकूण खर्च मिळतो.
सूत्र
- एकूण खर्च = एकूण स्थिर खर्च + एकूण बदलता खर्च
TC =
TFC + TVC
स्थिर
खर्च - स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च.
उदा., जमीन, यंत्रे इत्यादी. बदलता खर्च - बदलत्या
घटकांवर केला जाणारा खर्च. हा खर्च उत्पादनाच्या प्रमाणात बदलला जातो. उदा.,
श्रम, कच्चा माल, ऊर्जा,
इंधन इत्यादी.
एकूण प्राप्ती :- वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी
एकूण रक्कम म्हणजे एकूण प्राप्ती होय. हे उद्योगसंस्थेचे एकूण उत्पन्न होय.
पुढील सूत्राच्या साहाय्याने एकूण प्राप्ती
मोजली जाते.
सूत्र
- एकूण प्राप्ती = एकूण नगसंख्या × किंमत
उदा., समजा उद्योगसंस्थेने`रु. ३०० प्रमाणे १५ टेबलांची विक्री
केली. तर एकूण प्राप्ती किती?
एकूण प्राप्ती = एकूण नगसंख्या × किंमत = १५ टेबल × ३०० रु.
` एकूण प्राप्ती = रु. ४५००`
२) पुरवठा
निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा.
उत्तर :- पुरवठा निर्धारक घटक :
१) वस्तूची किंमत : किमंत
हा वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करणारा पहिला घटक आहे. जास्त किमतीला अधिक पुरवठा
केला जातो व कमी किमतीला कमी पुरवठा केला जातो. अशा प्रकारे किेमंत व पुरवठा यांच्यात
सम सबंधं असतो.
२) तंत्रज्ञानाची स्थिती
: उत्पादन तंत्रातील सुधारणांमुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढते व
पुरवठाही वाढतो.
३) उत्पादन खर्च : उत्पादन
घटकांच्या किमती वाढल्या तर उत्पादन खर्च वाढतो. परिणामी पुरवठा कमी होतो.
४) पायाभूत सुविधा : वीज, वाहतूक, दळणवळण इत्यादी पायाभूत सुविधांचा परिणाम
उत्पादन प्रक्रिया व पुरवठ्यावर होतो. या सुविधांच्या अभावामुळे पुरवठा कमी होतो
आणि सुविधांची अधिक उपलब्धता असल्यास पुरवठा जास्त केला जातो.
५) सरकारची धोरणे :
अनुकूल शासकीय धोरणामुळे पुरवठा वाढतो आणि प्रतिकूल शासकीय धोरणामुळे पुरवठा कमी होतो.
सरकारचे करविषयक, अर्थसाहाय्य, औद्योगिक धोरणे इत्यादी धोरणामुळे उत्पादन आणि पुरवठा कमी जास्त होऊ
शकतो. त्यामुळे सरकारच्या धोरणावर पुरवठा अवलंबून आहे.
६) नैसर्गिक परिस्थिती :
कृषी उत्पादनांचा पुरवठा नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो. उदा., चांगला पाऊस आणि योग्य हवामान असल्यास चांगले उत्पादन होते. त्यामुळे
कृषी उत्पादन वाढून पुरवठा वाढतो. याउलट प्रतिकूल हवामानामुळे पुरवठा कमी होतो.
७) भविष्यकालीन किमतीचा
अंदाज : नजीकच्या भविष्यात किमती वाढण्याची शक्यता असल्यास उत्पादक साठा वाढवेल.
त्यामुळे पुरवठा कमी होईल आणि याउलट किमती कमी होण्याची शक्यता असल्यास उत्पादक
साठा कमी करून पुरवठा वाढवेल.
८) इतर घटक : १) बाजाराचे
स्वरूप,
२) इतर वस्तूंच्या सापेक्ष किमती ३) आयात निर्यात संबंध ४) औद्योगिक संबंध ५) उत्पादन घटकांची उपलब्धता
इत्यादी घटक अनुकूल असतील तर वस्तूचा पुरवठा वाढतो आणि घटक प्रतिकूल असतील तर
पुरवठा घटतो.
प्र. ७. सविस्तर उत्तरे द्या :
१) पुरवठ्याचा
नियम अपवादासह स्पष्ट करा.
उत्तर :- पुरवठ्याचा नियम :
प्रस्तावना : प्रा. आल्फ्रेड मार्शल यांनी सन
१८९० मध्ये प्रकाशित केलेल्या ‘अर्थशास्त्राची मूलतत्त्वे’ या पुस्तकात मागणी
नियमाप्रमाणेच पुरवठ्याचा नियमही मांडला आहे. या नियमाद्वारे किंमत व पुरवठा
यांतील परस्पर संबंध स्पष्ट केला आहे.
नियम :- ‘‘इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा
केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो.’’
दुसऱ्या शब्दात इतर घटक स्थिर असताना किंमत वाढल्यास वस्तूच्या नगसंख्येचा पुरवठा वाढतो, तर किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. अशा प्रकारे नगसंख्या आणि किंमत यांचा सम संबंध असतो. किंमत व पुरवठा यांतील सहसंबंध खालील प्रकारे स्पष्ट करता येतो.
Sx = f (Px)
जिथे, S = पुरवठा
x = वस्तू
f = फलन
P = किंमत
गृहीतके (Assumption):- पुरवठ्याचा
नियम हा खालील गृहीतकांवर आधारित आहे.
१)
स्थिर उत्पादन खर्च :
उत्पादन खर्चात बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. कारण उत्पादन खर्चातील बदलामुळे
विक्रेत्याच्या नफ्यात बदल होईल आणि त्याच किमतीला पुरवठा कमी केला जाईल.
२)
स्थिर उत्पादन तंत्र :
उत्पादन तंत्रात बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. सुधारित तंत्रामुळे उत्पादनात
वाढ होते. त्याच किमतीला पुरवठा वाढतो.
३)
हवामानाच्या स्थितीत बदल नाही
:- हवामानाच्या स्थितीत बदल होत नाही हे
गृहीत धरले आहे. पूर, भूकंप, दुष्काळ
अशा नैसर्गिक आपत्तींमुळे पुरवठा घटू शकतो.
४)
सरकारी धोरणात बदल नाही :-
सरकारच्या व्यापार विषयक व कर विषयक धोरणात कोणताही बदल होत नाही असे गृहीत
धरण्यात आले आहे.
५)
वाहतूक खर्च स्थिर :- वाहतूक
खर्च व वाहतूक सुविधा यांत कोणताही बदल होत नाही, असे गृहीत धरण्यात आले आहे. उदा., चांगल्या वाहतूक
सुविधांमुळे किंमत तीच असताना पुरवठ्यात वाढ होईल.
६)
इतर वस्तूंच्या किमती स्थिर :-
इतर वस्तूंच्या किमती स्थिर आहेत असे गृहीत धरण्यात आलेआहे. जर इतर वस्तूंच्या किमतीत
बदल झाला तर उत्पादक उत्पादन घटकांचा वापर इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी करेल.
७)
भविष्यकालीन किमतीचा अंदाज नाही
:- भविष्यकाळात वस्तूंच्या
किमतीत होणाऱ्या बदलाविषयी उत्पादक विक्रेत्याला कोणताही अंदाज करता येत नाही, असे गृहीत धरण्यात आले आहे. पुरवठ्याचा नियम खालील पत्रक व आकृतीच्या
साहाय्याने अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येतो.
पुरवठा नियमाचे
पत्रक :-
|
क्ष वस्तूची किंमत |
क्ष वस्तूचा पुरवठा नगसंख्या |
|
10 |
१०० |
|
20 |
200 |
|
30 |
300 |
|
40 |
४०० |
|
50 |
५०० |
क्ष वस्तूची किंमत आणि नगसंख्या
यांमधील प्रत्यक्ष संबंध स्पष्ट केला आहे. जेव्हा किंमत १० पासून २०, ३०, ४० व ५० रुपयांपर्यंत अनुक्रमे वाढते तेव्हा पुरवठा
सुद्धा १००,२००,३००,४०० व ५०० नगसंख्येपर्यंत पुरवठा वाढतो. याचा अर्थ जेव्हा किंमत वाढते तेव्हा
पुरवठाही वाढतो आणि किंमत कमी होते तेव्हा पुरवठाही कमी होतो. वस्तूची किंमत आणि
पुरवठा यांचा सम संबंध असतो.
वरील आकृतीत वस्तूचा पुरवठा नगसंख्या ‘क्ष’
अक्षावर आणि किंमत ‘य’ अक्षावर दाखविली आहे. ‘पप’ हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे
वर जाणारा असून किंमत आणि पुरवठा यांचा
प्रत्यक्ष संबंध दाखविला आहे.
पुरवठा नियमाचे अपवाद
:
पुरवठा नियमाचेअपवाद
खालीलप्रमाणेः
१)
श्रमाचा पुरवठा :
दिलेल्या वेतनदरावर श्रमिकांनी केलेल्या कामाचे तास म्हणजे श्रमाचा पुरवठा होय.
तो पुरवठा वक्र आलेखाच्या सहाय्याने दाखविता येतो. यामध्ये मजूरीचा दर वाढत असताना
(कामाचेतास) श्रमाचा पुरवठा वाढतो. त्यामुळे पुरवठा वक्र वर जातो. परंतु मजूरीचा
दर पुढे वाढल्यास श्रमाचा पुरवठा (कामाचे तास) कमी होतो आणि श्रमाचा पुरवठा वक्र
मागे वळतो. कारण मजुरीच्या स्वरुपात जास्त रक्कम मिळाल्यानंतर श्रमिक
विश्रांतीच्या अपेक्षेने श्रमाचापुरवठा कमी करतो. म्हणजेच एका विशिष्ट पातळीनंतर
वेतन दर वाढल्यास श्रमाचापुरवठा कमी होतो. हे श्रमाच्या मागे वळणाऱ्या पुरवठा
वक्राच्या सहाय्याने स्पष्ट करता येते.
२)
कृषी उत्पादने :
विशिष्ट वेळी उत्पादन होणारा शेतमाल या नियमाला अपवाद ठरतो. कारण शेतीचे उत्पादन
हंगामी असते. हवामानात प्रतिकूल बदल झाल्यास शेतीचे उत्पादन कमी होईल. तेव्हा
जास्त किमतीलाही वस्तूचा पुरवठा वाढणार नाही.
३)
रोख रकमेची तीव्र गरज :
जर विक्रेत्याला रोख रकमेची तीव्र गरज असेल तर विक्रेता आपला माल बाजार किमतीपेक्षा
ही कमी किमतीला विकेल किंवा पुरवठा वाढवेल. किमती वाढत नसतानाही विक्री करेल व त्यामुळे
पुरवठ्यात वाढ होईल.
४)
नाशवंत वस्तू :
नाशवंत वस्तूंच्या बाबतीत नुकसान टाळण्यासाठी विक्रेते कमी किमतीला जास्त पुरवठा
करू शकतात. उदा., भाजीपाला, अंडी
इत्यादी.
५)
दुर्मिळ वस्तू :
ज्या वस्तू सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाहीत, अशा वस्तूंच्या
बाबतीत सुद्धा पुरवठा नियम सिद्ध होत नाही. उदा., दुर्मिळ
चित्रे, नाणी, मौल्यवान वस्तू इत्यादी.
या वस्तूंची निर्मिती पुन्हा करता येत नाही. म्हणून अशा वस्तूंच्या किमती वाढल्या
तरी पुरवठा वाढविता येत नाही.
Share
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.