प्रकरण क्र. ५ बाजाराचे प्रकार

                      


      स्वाध्याय

 

प्रश्न १. अ) योग्य पर्याय निवडा :

१) अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजारात खालील घटकांचा समावेश हातो.

अ) ज्‍या ठिकाणी वस्‍तू व सेवांची खरेदी-विक्री केली जाते.

ब) ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्या प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष संपर्कात येतात.

क) वस्तूंची विक्री करणारे दुकान

ड) वरील सर्व

पर्याय :-  १) अ आणि ब      २) ब आणि क   

   ३) अ, ब आणि क    ४) फक्‍त ब

उत्तर :-  ३) अ, ब आणि क

२) बाजारपेठेचे वर्गीकरण स्‍थळाच्या आधारावर खालीलप्रमाणे केले जाते. (ऑगस्ट २२)

अ) स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार

ब) अत्यल्पकालीन बाजार, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार

क) अल्पकालीन बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार

ड) स्‍थानिक बाजार, राष्‍ट्रीय बाजार, अल्‍पकालीन बाजार.

पर्याय :- १) अ, ब आणि क    २) ब, क आणि ड

   ३) फक्‍त अ         ४) अ आणि ड

उत्तर :- ३) फक्‍त अ

३) एकजिनसी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्ये आहे.

अ) मक्तेदारी     ब) मक्‍तेदारीयुक्‍त स्पर्धा

क) पूर्ण स्पर्धा     ड) अल्‍पाधिकार

पर्याय :-  १) क, ड      २) अ, ब, क

   ३) अ, क, ड    ४) फक्‍त क

उत्तर :- ४) फक्‍त क  

४) पूर्ण स्पर्धेत विक्रेत्‍याची भूमिका पुढील प्रकारची असते.

अ) किंमतकर्ता         ब) किंमत स्वीकारणारा

क) किंमतभेद करणारा   ड) यांपैकी नाही.

पर्याय :-  १) अ, ब, क    २) फक्‍त ब

   ३) फक्‍त क    ४) अ आणि क

उत्तर :- ब) किंमत स्वीकारणारा

५) वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च ......(मार्च २२)

अ) एकूण खर्च ब) सरासरी खर्च क) सीमांत खर्च ड) विक्री खर्च

पर्याय :- १) फक्त अ २) फक्त ब ३) फक्त क ४) फक्त ड

उत्तर :- ४) फक्त ड

6) अल्पाधिकार बाजाराची वैशिष्टे

अ) कांही विक्रेते         

ब) भिन्न विक्रेते उत्पादनाची विक्री करतो.

क) मुक्त प्रवेश व निर्गमन

ड) या बाजारात लक्षणीय अनिश्चितता असते.

पर्याय : १) अ,ब २) अ,ब,क ३) ब,क ४) अ,ड

उत्तर :  ४) अ,ड

१२. दीर्घ काळाच्या बाजाराची वैशिष्टे

अ) उत्पादन घटक आणि खर्च बदलू शकतात

ब) दीर्घ काळात उद्योगसंस्थाना सर्व प्रकारच्या खर्चाशी

 जुळवून घेणे शक्य होते.

क) हा कालावधी पाच वर्षापेक्षा जास्त असतो.

ड) वस्तूचा पुरवठा वाढविता येत नाही.

पर्याय : १) अ,क,ड २) अ,ब ३) ब,क,ड ४) अ,ब,क,ड

उत्तर : २) अ,ब

प्रश्न २. आर्थिक पारिभाषिक शब्‍द सुचवा :

     १)    काही विक्रेते असलेला बाजार

उत्तर : अल्पाधिकार बाजार

     २)    मागणी वक्र व पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात असा बिंदू

उत्तर : समतोल बिंदू  

     ३)    वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च (जुलै २३)

उत्तर : विक्री खर्च

     ४)    एकजिनसी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय

उत्तर : उद्योग

     ५)    एकच वस्‍तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किंमती आकारणे.

उत्तर : मूल्य भेद  

     ६)    प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार. (मार्च २३)

उत्तर : मक्तेदारीयुक्त स्पर्धा

     ७)    असा कालावधी की, ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादनाचा खर्च बदलणे शक्य असते.                                                                                         (मार्च २२)

उत्तर : दीर्घकाळ

    ८)   बाजाराचा असा प्रकार की ज्यात स्पर्धायुक्त बाजाराची सर्व वैशिष्टे आढळत नाहीत तर काही वैशिष्टे आढळतात.

उत्तर : अपूर्ण स्पर्धा

     ९)    एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय.

उत्तर : मक्तेदारीयुक्त स्पर्धा    

प्रश्न ३. सहसंबंध स्पष्ट करा :

      १)    पूर्ण स्पर्धा :  असंख्य विक्रेते   :: मक्तेदारी : एकच विक्रेता (ऑगस्ट २२)

      २)    पूर्ण स्पर्धा : मुक्त प्रवेश व निर्गमन :: मक्तेदारी   : एकच विक्रेता

      ३)    किंमत स्वीकारणारा :  पूर्ण स्पर्धा   :: किंमत कर्ता : मक्तेदारी

      ४)    एकच किंमत : पूर्ण स्पर्धा :: भिन्न किंमत : मक्तेदारी

      ५)    गट संकल्पना : मक्तेदारीयुक्त स्पर्धा :: उद्योग : पूर्ण स्पर्धा

     ६)   
मक्तेदारी : मुल्यभेद ::   मक्तेदारीयुक्त स्पर्धा      : वस्तू भेद

     ७)    पूर्ण स्पर्धा : मुक्त प्रवेश व निर्गमन ::  मक्तेदारी   : प्रवेशावर निर्बंध

      

  प्रश्न ४. विसंगत शब्द ओळखा :

       १)    स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार :

       पूर्ण स्पर्धा , मक्तेदारी, अल्पाधिकार, अत्यल्पकालीन बाजार (ऑगस्ट २३)

        उत्तर : अत्यल्पकालीन बाजार

       २)    विक्री खर्च :

        मोफत भेट वस्तू, फलक जाहिरात, खिडकी प्रदर्शन, पेटंट

        उत्तर : पेटंट

       ३)    स्थळानुसार बाजार  :

       स्थानिक बाजार, अल्पाधिकार बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार

        उत्तर : अल्पाधिकार बाजार

       ४)    मक्तेदारीची वैशिष्ट्ये :

       किंमतकर्ता, प्रवेश निर्बंध, अनेक विक्रेते, पर्यायी वस्तूंचा बाजार अभाव

      उत्तर : अनेक विक्रेते  

       ५)    कायदेशीर मक्तेदारी :

       पेटंट, ओपेक, कॉपीराइट, बोधचिन्ह

       उत्तर : ओपेक

   

प्रश्न ५ विधाने व तर्क प्रश्न सोडवा :

१)    विधान (अ) : पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत, मागणी आणि पुरवठ्याच्या 

      समतोलातून ठरते.

तर्क विधान (ब) : असंख्य ग्राहक आणि विक्रेते असल्याने कोणतीही एक व्यक्ती 

किंमतीवर प्रभाव टाकू शकणार नाही. (मार्च २३)

पर्याय :

(अ) विधान ‘अ’ सत्य आहे पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

(ब) विधान ‘अ’ असत्य आहे पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.

(क) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

(ड) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण नाही.

उत्तर : (क) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

२)    विधान (अ) : मक्तेदारीत मुल्यभेद केला जातो.

तर्क विधान (ब) : वस्तुभेद म्हणजे प्रत्येक उद्योगसंस्थेचे उत्पादन हे बाजारातील   

दुसऱ्या उद्योगसंस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळे असते.

पर्याय :

(अ) विधान ‘अ’ सत्य आहे पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

(ब) विधान ‘अ’ असत्य आहे पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.

(क) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

(ड) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण नाही.

उत्तर : (ड) दोन्ही विधाने सत्य असून विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण नाही.

३)    विधान (अ) : मक्तेदार हा किंमत कर्ता असतो.

 तर्क विधान (ब) : मक्तेदार हा स्वतःच्या मालाची किंमत निश्चित करतो त्यामुळे 

त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते. 

पर्याय : 

अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.  

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

 स्पष्टीकरण नाही.

उत्तर : दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य 

स्पष्टीकरण आहे.

४)    विधान (अ) : वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.

 तर्क विधान (ब) : मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूंना जवळचे पर्याय उपलब्ध नसतात.

पर्याय : 

अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.   

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण नाही.

उत्तर : विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

 प्रश्न ५. थोडक्यात उत्तरे लिहा :

१)    अल्‍पाधिकार बाजाराची कोणतीही चार वैशिष्ट्ये सांगा.

उत्तर :- अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये :-

अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

१) काही विक्रेते : अल्पाधिकार बाजारात काही उद्योगसंस्था किंवा विक्रेते असतात. 

बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते. तसेच त्यांचे किमतीवर व वस्तूच्या 

उत्पादनावरही लक्षणीय नियंत्रण असते.

२) परस्परावलंबन : प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना 

दक्ष राहावे लागते. या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योगसंस्थेने वस्तूच्या 

किमतीत बदल केल्यास इतर उद्योगसंस्थानांही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी 

जुळवून घ्यावे लागते.

३) जाहिरात : अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन आहे. अल्पाधिकारात 

उद्योगसंस्था जास्तीतजास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक 

जाहिरात मोहीम हाती घेऊ शकते.

४) प्रवेशावर निर्बंध : कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू 

शकतात. परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. जसे की 

सरकारी परवाना, पेटंट इत्‍यादी.

५) समानतेचा अभाव : उद्योगसंस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते. काही 

आकाराने लहान तर काही मोठ्या असतात.

६) अनिश्चितता : या बाजारात लक्षणीय / विचारात घेण्याइतपत अनिश्चितता असते. 

कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचे असते. प्रतिस्पर्धी 

उद्‌दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हातमिळवणी करून एकमेकांना सहकार्यही करू 

शकतात किंवा एकमेकांशी संघर्षही करू शकतात.

२) मक्तेदारीचे कोणतेही चार प्रकार स्पष्ट करा.

          उत्तर : मक्तेदारीचे प्रकार :-

           मक्तेदारीचे चार प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

१) खाजगी मक्तेदारी : जेव्हा एखादी व्यक्ती/खाजगी संस्था मक्तेदारी उद्योगसंस्थेचे 

नियंत्रण करतेतेव्हा त्यास खाजगी मक्तेदारी म्हणतात. खाजगी मक्तेदारी ही नफ्याने प्रेरित 

झालेली असते. उदा. टाटा समूह.

२) सार्वजनिक मक्तेदारी : जेव्हा एखादी उत्पादनसंस्था पूर्णत: सरकारच्या मालकीची, 

सरकारने नियंत्रित केलेली आणि सरकारने चालविलेली असते, तेव्हा त्यास सार्वजनिक 

मक्तेदारी असे म्हणतात. ही मक्तेदारी कल्याणकारी हेतूने प्रेरित झालेली असते. 

उदा. भारतीय रेल्वे.

३) कायदेशीर मक्तेदारी : पेटंट, बोधचिन्ह, स्‍वामित्‍व अधिकार यांसारख्या शासनाच्या 

कायदेशीर तरतुदींमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी असे म्हणतात. 

नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हांच्या अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवेश करण्यास या 

मक्तेदारीत मनाई केली जाते. तसेच त्या चिन्हाचे किंवा आकाराचे अनुकरण करण्यासाठी 

मनाई केली जाते. उदा. अमूलची उत्पादने. ४) नैसर्गिक मक्तेदारी : विशिष्ट स्थल, 

हवामान, पर्जन्यमान इ. नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस नैसर्गिक 

मक्तेदारी असे म्हणतात. उदा., पंजाबचा गहू.

५) साधी मक्तेदारी : साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योगसंस्था एका प्रकारच्या 

उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारते.

६) मूल्यभेदात्मक मक्तेदारी : मूल्यभेदात्मक मक्तेदारीत उद्योगसंस्था एकाच प्रकारच्या 

उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारते. उदा., डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णांकडून 

वेगवेगळी फी आकारतात.

७) ऐच्छिक मक्तेदारी : जीवघेणी स्‍पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार स्वेच्छेने एकत्र 

येतात व मक्तेदारांचा गट स्थापन करतात. उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करून महत्तम 

नफा मिळविणे यामुळे सोयीचे होते. उदा., ओपेक (OPEC)

प्रश्न ७. सविस्‍तर उत्‍तरे लिहा :

१)    मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

उत्तर :-  मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये :-

मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

१) अनेक विक्रेते : मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या जास्त असते. परंतु तुलनेने पूर्ण 

स्पर्धेतील विक्रेत्यांपेक्षा कमी असते. या कारणामुळे विक्रेत्याचे वर्तन मक्तेदारी प्रमाणे असते.

२) असंख्य ग्राहक : मक्तेदारीयुक्त स्पर्धेत असंख्य ग्राहक असतात. परिणामी, कोणताही 

एक ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत बदल करून वस्तूच्या किमतीत बदल घडवून 

आणू शकत नाही.

३) वस्तुभेद : वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहे. या बाजारात 

अनेक उद्योगसंस्था विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करतात. परंतु प्रत्येक उद्योगसंस्थेचे उत्पादन हे 

बाजारातील दुसऱ्या उद्योगसंस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळे असते. यालाच वस्तूभेद असे 

म्हणतात. हा वस्तुभेद ब्रॅण्ड (छाप), व्यापारी चिन्ह (ट्रेड मार्क), वस्तूची आकर्षक बांधणी, 

दर्जा, नक्षीकाम, रंग, वेष्टन, आकार इ. बाबतींत आढळतो. याचा अर्थ उद्योगसंस्थेच्या 

उत्पादनाला जवळचे पर्याय आढळतात आणि त्यांच्या मागणीची छेदक लवचिकता अधिक 

आहे. उदा. भ्रमणध्वनी (मोबाईल), शीतपेय इ.

४) मुक्त प्रवेश व निर्गमन : पूर्ण स्पर्धेप्रमाणे याही बाजारात नवीन व्यवसाय संस्थांना मुक्त 

प्रवेश असतो. त्याचप्रमाणे तोटा होत असल्यास कोणतीही उद्योगसंस्था उत्पादन बंद करून 

स्पर्धेतून बाहेर पडू शकते.

५) विक्री खर्च : विक्री खर्च हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेतच आढळतो. उत्पादकाच्या 

उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा 

लागणारा खर्च म्हणजेच विक्री खर्च होय. जाहिरात, दूरदर्शन, आकाशवाणी, फलक 

जाहिराती, प्रदर्शन, खिडकी प्रदर्शन, मोफत भेट वस्तू, मोफत नमुना वस्तू इत्‍यादींचा 

समावेश विक्री खर्चात होतो.

६) जवळचे पर्याय : मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूंना अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात. 

उदा., विविध कंपन्यांचे साबण, शीतपेय इ.

७) गटसंकल्पना : मक्तेदारीयुक्त स्पर्धेत चेंबरलीन यांनी उद्योग या संकल्पने ऐवजी 

गटाची संकल्पना वापरली. एकजिनसी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे 

उद्योग होय, तर एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या 

संस्थांचा समुदाय म्हणजे गट होय. उदा., औषध उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समूह.





स्त्रोत :- महाराष्ट्र पाठ्यपुस्तक महामंडळ पुणे इयत्ता १२ वी अर्थशास्त्र 

              प्रकरण ५    बाजाराचे प्रकार






 

google.com, pub-8018779218614409, DIRECT, f08c47fec0942fa0

Share