12 वी अर्थशास्त्र सहामाही परीक्षा प्रश्नपेढी
प्रश्न १ अ)
योग्य पर्याय निवडा
१) सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पध्दत
अ) राशी पध्दत ब) समग्र पध्दत
क) विभाजन पद्धत ड) सर्वसमावेशक पध्दत
पर्याय - १) अ, क, ड २) फक्त क
३) ब, क, ड ४) फक्त अ
उत्तर
:- २) फक्त क
२) स्थूल अर्थशास्त्र व्याप्ती .............
अ) उपभोग फलन ब) गुंतवणूक फलन
क) वैयक्तिक मागणी ड) रोजगार पातळी
पर्याय :- १) अ, ब, ड २) ब, क, ड
३) फक्त ड ४) फक्त क
उत्तर
:- १) अ, ब,
ड
३) घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना ...............
अ) संख्यात्मक संकल्पना
ब) क्रमवाचक संकल्पना
क) क्रमवाचक संकल्पना आणि संख्यात्मक संकल्पना
ड) यांपैकी नाही
पर्याय - १) अ आणि ब २) फक्त अ
३) क आणि ड ४) फक्त ड
उत्तर :- २) फक्त अ
४) घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात आल्फ्रेड मार्शल
यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता
अ) वाढते ब) स्थिर रहाते
क) घटते ड) वाढते आणि नंतर घटते.
पर्याय :- १) क आणि ड २) फक्त अ
३) फक्त ब ४) अ, ब, क, ड.
उत्तर
:- ३)
फक्त ब
५)
हलक्या प्रतीच्या वस्तू बाबत उत्पन्न व मागणी यात ---------
अ) प्रत्यक्ष संबंध असतो
ब) व्यस्त संबंध असतो
क) कोणताही बदल होत नाही
ड) प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो
पर्याय - १) अ, क, ड २) फक्त ब
३) क, ड ४) अ, ड
उत्तर :- ब) व्यस्त संबंध असतो
६) किंमतीतील बदलापेक्षा जेंव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते
तेंव्हा असणारा मागणी वक्र .................
अ) पसरट ब) तीव्र उताराचा
क) ‘क्ष’ अक्षास समांतर ड) ‘य’ अक्षास समांतर
पर्याय - १) फक्त अ २) ब आणि क
३) अ आणि ड ४) फक्त ब
उत्तर :- १) फक्त अ
७) रेषीय मागणी वक्रावरील क्ष अक्षावर असलेली
मागणीची किंमत लवचिकता.
अ) शून्य ब) एक
क) अनंत २) ED < 1
पर्याय - १) फक्त अ २) अ, ब
३) अ, क, ड ४) ब, ड
उत्तर :- १) फक्त अ
८)
पुरवठा नियमाचा वक्र ………. असतो
अ) डावीकडून उजवीकडे वर जाणारा
ब) डावीकडून उजवीकडे खाली येणारा
क) क्षितीजसमांतर
ड) मागे वळणारा.
पर्याय :- १) फक्त अ २) फक्त ब
३) फक्त ड ४) फक्त क
उत्तर :- १) फक्त अ
९) जेव्हा पुरवठा वक्र मुळ पुरवठा वक्राच्या उजव्या
बाजूस सरकतो तेव्हा त्यास ---------- म्हणतात.
अ) पुरवठा संकोच ब) पुरवठयाचा ऱ्हास
क) पुरवठयाचा विस्तार ड) पुरवठयातील वाढ
पर्याय - १) अ, ब २) क, ड ३) ब, क ४) फक्त ड
उत्तर :- ४) फक्त ड
१०) एकजिनसी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्ये आहे.
अ) मक्तेदारी ब) मक्तेदारीयुक्त
क) पूर्ण स्पर्धा ड) अल्पधिकार
पर्याय - १) क, ड २) अ,ब,क
३) अ, क, ड ४) फक्त क
उत्तर :- ४) फक्त क
११) मूल्यभेद हे ........................या बाजाराचे
प्रमुख वैशिष्ट्य आहे.
अ) पूर्ण स्पर्धा ब) मक्तेदारी
क) मक्तेदारीयुक्त स्पर्धा ड) यांपैकी सर्व
पर्याय -
१) अ आणि ब २) ब आणि क
३) फक्त ब ४) फक्त ड
उत्तर :- ३) फक्त ब
१२) भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने :
अ) प्रत्येक वस्तूला सारखेच महत्त्व दिले जाते.
ब) विविध वस्तुंना योग्य भारांश दिला जातो.
क) बहुतेक वेळा संख्या भारांश म्हणून वापरली जाते.
ड) भारान्वित निर्देशांक मोजण्यासाठी लासपेअर आणि पाश्चेची पद्धत वापरली जाते.
पर्याय - १) अ, क आणि ड २) ब,क आणि ड
३) अ,ब आणि ड ४) अ,ब,क आणि ड
उत्तर :- २) ब,क आणि ड
१३) किंमत निर्देशांकाविषयी अयोग्य संबंध असलेली विधाने.......
अ) निर्देशांकाचे भौगोलिक साधन
ब) हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते.
क) आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते.
ड) निर्देशांक हा विशिष्ट सरासरीत असतो.
पर्याय :- १) क आणि ड २) अ आणि ब
३) ब आणि क ४) अ, ब, क, ड.
उत्तर
:- २)
अ आणि ब
प्रश्न १. ब) आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा :
१)
भांडवलाचा मोबदला -- व्याज
२)
श्रम या उत्पादन घटकाचा पैशातील मोबदला – वेतन
३)
भूमी या उत्पादन घटकांचा पैशातील मोबदला – खंड
४)
अर्थव्यवस्थेची अशी शाखा जी अर्थव्यवस्थेच्या
लहान लहान भागांशी संबंधित आहे. – सूक्ष्म अर्थशास्त्र
५)
वस्तूंच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त
होणा-या एकत्रित उपयोगितेची बेरीज
– एकूण उपयोगिता
६)
एका वस्तुची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते.-- संमिश्र मागणी
७)
मागणीतील अनंत बदलामुळे होणारी लवचिकता.
-- संपूर्ण / अनंत लवचिक मागणी
८)
किंमतीत अल्प किंवा जास्त बदल न होता मागणीत
होणारा अनंत बदल -- संपूर्ण / अनंत लवचिक मागणी
९)
प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनाचा खर्च – सरासरी खर्च
१०) प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती – सरासरी प्राप्ती
११)
एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना
वेगवेगळ्या किंमती आकारणे –
मुल्यभेद
१२)
कच्च्या मालावर केला जाणारा खर्च –
बदलता खर्च
१३)
अशी वस्तू जी अनेक उपयोगांसाठी वापरली जाते – विविध उपयोगी वस्तू
१४) वस्तूंची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च –
विक्री खर्च
१५) असा कालावधी की ज्यांत उत्पादनाचे घटक आणि
उत्पादनाचा खर्च बदलणे शक्य असते
– दीर्घकाळ
१६) दोन भिन्न कालावधीत वस्तूंच्या किमतीत होणा-या बदलाचे
मापन करणारा निर्देशांक – किंमत निर्देशांक
प्रश्न १ अ) खालील सहसंबंध पूर्ण करा.
१) सर्वसाधारण समतोल : स्थूल अर्थशास्त्र :: आंशिक समतोल : सूक्ष्म अर्थशास्त्र
२) पाणी : उपयोगिता मूल्य > विनिमय मूल्य :: हिरा : उपयोगिता मूल्य < विनिमय मूल्य
३) शिक्षक : सेवा उपयोगिता :: छत्री/ रेनकोट : काळ उपयोगिता
४) भांडवल : अप्रत्यक्ष मागणी :: छत्री : प्रत्यक्ष
मागणी
५) चहा आणि कॉफी : पर्यायी वस्तू :: मोबाईल आणि सिमकार्ड : पूरक वस्तू
६) कमी किंमत :
मागणीचा
विस्तार :: जास्त किंमत : मागणीचा संकोच
७) गट : मक्तेदारीयुक्त स्पर्धा :: उद्योग : पूर्ण स्पर्धा
८) किंमत स्वीकारणारा : पूर्ण स्पर्धा :: किंमत कर्ता : मक्तेदारी
९) मूळ वर्ष किंमत : P० :: चालू वर्षातील किंमत : P1
१०) P० : मूळ वर्ष किंमत ::
P1 : चालू वर्ष किंमत
१) विधान अ) : सूक्ष्म अर्थशास्त्रत विभाजन पद्धतीचा वापर केला जातो.
तर्क विधान ब) : विभाजन पद्धत म्हणजे विशिष्ट घटकाचा तपशीलवार अभ्यास.
पर्याय : अ) विधान “अ” सत्य आहे पण तर्क विधान “ब” असत्य आहे.
ब) विधान “अ” असत्य आहे पण तर्क विधान “ब” सत्य आहे.
क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान “ब” हे विधान “अ” चे योग्य
स्पष्टीकारण करते.
ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान “ब” हे विधान “अ” चे योग्य
स्पष्टीकारण करत नाही.
उत्तर :- क
२) विधान अ) : सीमांत उपयोगिता घटत जाते.
तर्क विधान ब) : एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते.
पर्याय : अ) विधान “अ” सत्य आहे पण तर्क विधान “ब” असत्य आहे.
ब) विधान “अ” असत्य आहे पण तर्क विधान “ब” सत्य आहे.
क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान “ब” हे विधान “अ” चे योग्य
स्पष्टीकारण करते.
ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान “ब” हे विधान “अ” चे योग्य
स्पष्टीकारण करत नाही.
उत्तर
:- ड
३)
विधान अ) सर्व इच्छा म्हणजे मागणी नव्हे.
तर्क विधान ब) अर्थशास्त्रीय दृष्ट्या मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे
पाठबळ असते.
पर्याय : अ) विधान “अ” सत्य आहे पण तर्क विधान “ब” असत्य आहे.
ब) विधान “अ” असत्य आहे पण तर्क विधान “ब” सत्य आहे.
क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान “ब” हे विधान “अ” चे योग्य
स्पष्टीकारण करते.
ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान “ब” हे विधान “अ” चे योग्य
स्पष्टीकारण करत नाही.
उत्तर
:- क
४)
विधान अ) एका वस्तूच्या किंमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो.
तर्क विधान ब) उपभोक्त्याच्या उत्पनातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो.
पर्याय : अ) विधान “अ” सत्य आहे पण तर्क विधान “ब” असत्य आहे.
ब) विधान “अ” असत्य आहे पण तर्क विधान “ब” सत्य आहे.
क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान “ब” हे विधान “अ” चे योग्य
स्पष्टीकारण करते.
ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान “ब” हे विधान “अ” चे योग्य
स्पष्टीकारण करत नाही.
उत्तर
:- ड
५)
विधान अ) किंमतीतील वाढ ही वस्तूचा पुरवठा वाढवते.
तर्क विधान ब) एकूण उत्पादनाला साठा असे म्हणतात.
पर्याय : अ) विधान “अ” सत्य आहे पण तर्क विधान “ब” असत्य आहे.
ब) विधान “अ” असत्य आहे पण तर्क विधान “ब” सत्य आहे.
क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान “ब” हे विधान “अ” चे योग्य
स्पष्टीकारण करते.
ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान “ब” हे विधान “अ” चे योग्य
स्पष्टीकारण करत नाही.
उत्तर
:- ड
६)
विधान अ) निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे.
तर्क विधान ब) निर्देशांक हा मूलतः किंमत पातळीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केला आहे.
पर्याय : अ) विधान “अ” सत्य आहे पण तर्क विधान “ब” असत्य आहे.
ब) विधान “अ” असत्य आहे पण तर्क विधान “ब” सत्य आहे.
क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान “ब” हे विधान “अ” चे योग्य
स्पष्टीकारण करते.
ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान “ब” हे विधान “अ” चे योग्य
स्पष्टीकारण करत नाही.
उत्तर
:- क
७)
विधान अ) निर्देशांक रचनेत सर्व घटकांचा समावेश होतो.
तर्क विधान ब) निर्देशांक हा नमुन्यावर आधारित आहे.
पर्याय : अ) विधान “अ” सत्य आहे पण तर्क विधान “ब” असत्य आहे.
ब) विधान “अ” असत्य आहे पण तर्क विधान “ब” सत्य आहे.
क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान “ब” हे विधान “अ” चे योग्य
स्पष्टीकारण करते.
ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान “ब” हे विधान “अ” चे योग्य
स्पष्टीकारण करत नाही.
उत्तर
:- ब
८)
विधान अ) स्व – उपभोगासाठीचे उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जात नाही.
तर्क विधान ब) स्व – उपभोगासाठीचे उत्पादन बाजारात विक्रीसाठी येत नाही.
पर्याय : अ) विधान “अ” सत्य आहे पण तर्क विधान “ब” असत्य आहे.
ब) विधान “अ” असत्य आहे पण तर्क विधान “ब” सत्य आहे.
क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान “ब” हे विधान “अ” चे योग्य
स्पष्टीकारण करते.
ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान “ब” हे विधान “अ” चे योग्य
स्पष्टीकारण करत नाही.
उत्तर
:- क
प्र.२ रा अ)
खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
१) रमेशने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्थेच्या एकूण गुंतवणूक,
एकूण रोजगार, एकूण खर्च व एकूण बचत यांचे विश्लेषण केले.
संकल्पना :- स्थूल अर्थशास्त्र
स्पष्टीकरण :- संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय.
स्थूल अर्थशास्त्र एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार, एकूण खर्च, एकूण बचत, राष्ट्रीय उत्पन्न
अशा समग्र आर्थिक घटकांचे
विश्लेषण करते.
२)
रमेशने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले.
संकल्पना :- उत्पादन घटकांचे मोबदले
स्पष्टीकरण :- कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक
हे उत्पादनाचे चार घटक लागतात. उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्याने त्यांना
अनुक्रमे खंड, वेतन, व्याज आणि नफा हे मोबदले दिले जातात.
३)
निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले.
संकल्पना :- स्वामित्व उपयोगिता
स्पष्टीकरण :- वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते
तेंव्हा निर्माण होणाऱ्या उपयोगीतेस स्वामित्व उपयोगिता असे म्हणतात.
४)
अजयने लाकडी ओंडक्यापासून खुर्ची, टेबल तयार केली.
संकल्पना :- रूप उपयोगिता
स्पष्टीकरण :- एखाद्या वस्तूच्या स्वरूपात किंवा आकारमानात बदल केल्याने
जी उपयोगिता निर्माण होते त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात.
५)
अर्णव ने हिवाळ्यात त्याच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले.
संकल्पना :- काल उपयोगिता
स्पष्टीकरण :- काळ बदलल्याने काळानुसार वस्तूंमध्ये उपयोगिता निर्माण होते.
त्यास काल उपयोगिता असे म्हणतात. उदा. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात स्वेटरची
उपयोगिता
जास्त असते.
६) बागकामांची आवड असणाऱ्या विजयने मातीची कुंडी, खत आणि रोपटे
यांची एकत्रित मागणी केली.
संकल्पना :- पूरक मागणी
स्पष्टीकरण :- जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तू बरोबर केली जाते.
तेव्हा त्यास पूरक मागणी असे म्हणतात. विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी दोन किंवा
अधिक वस्तूंची मागणी एकत्रित केली जाते. त्यास पूरक मागणी
असे म्हणतात.
७) आंब्याचे भाव वाढल्यामुळे शीतलने ५ डझन आंब्याऐवजी केवळ ३ डझन
आंब्यांची मागणी केली.
संकल्पना :- मागणीतील संकोच
स्पष्टीकरण :- इतर परिस्थिती जसे की, आवडनिवड, उपभोक्त्यांचे उत्पन्न,
लोकसंख्येचे आकारमान इत्यादीमध्ये कोणताही बदल न होता फक्त किमतीत
वाढ झाल्याने
मागणीत घट होते त्यास मागणीतील संकोच म्हणतात.
८) कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचे केल्याने मास्क
तयार करणा-या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली.
संकल्पना :- अप्रत्यक्ष मागणी / परोक्ष मागणी
स्पष्टीकरण :- या वस्तूंची मागणी वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असते.
ही मागणी उत्पादनाच्या वस्तूंची असते. अशा प्रकारे उत्पादन घटकांची केलेली
मागणी म्हणजे
अप्रत्यक्ष मागणी होय.
९) हिवाळ्यात शीतपेयाची किंमत स्थिर असूनही मागणी कमी झाली.
संकल्पना :- मागणीतील ऱ्हास
स्पष्टीकरण :- इतर परिस्थिती जसे की, आवडनिवड, उपभोक्त्यांचे उत्पन्न,
नेसर्गिक परिस्थिती इत्यादीमध्ये प्रतिकूल बदल झाल्याने किंमत स्थिर असूनही
मागणी कमी होते. त्यास मागणीतील ऱ्हास
असे म्हणतात.
ब) फरक स्पष्ट करा.
१) सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र
२) विभाजन पद्धत आणि राशी पद्धत
३) स्थल उपयोगिता आणि काल उपयोगिता
४) एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता
५) इच्छा आणि मागणी
६) मागणीतील वृद्धी आणि मागणीतील -हास.
७) मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच
८) संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी
९) जास्त लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी
१०) साठा आणि पुरवठा
११) किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक
१२) उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती
१३) उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती
Share
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.