१२ वी अर्थशास्त्र बोर्ड प्रश्नपेढी

वस्तुनिष्ठ प्रश्न

प्रश्न १ योग्य पर्याय निवडा. 

१. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती

अ) वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत   ब) आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत

क) सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत   ड) उत्पन्न व रोजगार सिद्धांत

पर्याय : १) फक्त अ  २) अ,ब,क   ३) ब,क,ड   ४) अ,क,ड

उत्तर : १) फक्त अ

२. स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित विधान ……..

अ) स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते.

ब) स्थूल अर्थशास्त्र विशिष्ट घटकावर आधारित.

क) स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित

ड) स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र

पर्याय : १) अ,ब,क,ड     २) अ,ब,क     ३) ब,क,ड      ४) अ,क,ड

उत्तर : ४) अ,क,ड

3. घटत्या सीमांत उपयोगीतेचे अपवाद

अ) संस्थात्मक साधन     ब) छंद   क) कंजूष व्यक्ती    ड) पैसा

पर्याय : १) फक्त अ २) अ,ब,क     ३) ब,क,ड ४) अ,क,ड

उत्तर : ३) ब,क,ड

४. घटत्या सीमांत उपयोगीतेवरची टीका

अ) अवास्तव गृहीतके    

ब) अविभाज्य वस्तूसाठी लागू पडत नाही

क) हा सिद्धांत विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधाना पुरता मर्यादित 

ड) प्रत्यक्षात उपयोगीतेचे संख्यात्मक मापन करणे अशक्य असते.

पर्याय : १) फक्त अ २) अ,ब,क ३) ब,क,ड ४) अ,ब,क,ड

उत्तर : ४) अ,ब,क,ड

५) गीफेनचा विरोधाभास संबंधित विधान

अ) मागणीच्या नियमाचा अपवाद    

ब) कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तूमध्ये समावेश होतो.

क) कनिष्ठ वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते.

ड) हा विरोधाभास आल्फ्रेड मार्शल यांनी ओळखला .

पर्याय : १) फक्त अ २) अ,ब   ३) ब,क,ड ४) अ,ब,क,ड

उत्तर : २) अ,ब   

६) मागणीच्या ऱ्हासाशी संबंधित विधाने

अ) हा मागणीच्या बदलातील एक प्रकार आहे.

ब) इतर परिस्थिती जसे उपभोक्त्यांच्या आवडी निवडी, 

उपभोक्त्यांचे उत्पन्न इत्यादी प्रतिकूल बदल होतो

 तेव्हा मागणीचा ऱ्हास होतो.

क) या प्रकारामुळे किंमत बदलत नाही.

ड) मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे 

स्थानांतरीत होतो.

पर्याय : १) अ,ब,क,ड     २) अ,ब,क     ३) ब,क,ड     ४) अ,क,ड

उत्तर : २) अ,ब,क

७) संपूर्ण अलवचिक मागणीशी संबंधित चुकीची विधाने    

अ) किंमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणी   बदलत नाही.

ब) Ed = 1

क) मागणी वक्र ‘क्ष’ अक्षाशी समांतर

ड) किंमत लवचीकतेचा एक प्रकार

पर्याय : १) अ,ब,क,ड २) अ,ब,क ३) ब,क ४) अ,ब

उत्तर :   ३) ब,क

८) छेदक लवचीकतेशी संबंधित विधाने

अ) छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या 

किमतीतील बदलाचा अन्य वस्तूंच्या मागणीत घडून येणारा बदल  

ब) मागणीच्या लवचिकतेचा एक प्रकार आहे.

क) हे पूरक व स्पर्धात्मक मागणीशी संबंधित आहे.

ड) मागणीची छेदक लवचिकता = मागणीतील शेकडा बदल / किंमतीतील शेकडा बदल

पर्याय : १) अ,ब,क,ड २) अ,ब,क ३) फक्त ब ४) अ,ब

उत्तर : २) अ,ब,क

९) साठ्याशी संबंधित विधाने

अ) विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी

 उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय.

ब) उत्पादन वाढले असता साठा वाढतो.

क) साठा हा पुरवठ्यापेक्षा नेहमीच जास्त असतो.

ड) साठा ही प्रवाही संकल्पना आहे.

पर्याय : १) अ,ब,क,ड २) अ,ब,क ३) फक्त ब  ४) अ,ब

उत्तर : २) अ,ब,क

१०. पुरवठ्याचे अपवाद

अ) स्थिर उत्पादन खर्च    ब) स्थिर उत्पादन तंत्र

क) कृषी उत्पादने        ड) हवामानाच्या स्थितीत बदल नाही

पर्याय : १) अ,ब,क,ड २) अ,ब,क ३) फक्त क ४) अ,ब

उत्तर : ३) फक्त क

११. अल्पाधिकार बाजाराची वैशिष्टे

अ) कांही विक्रेते         ब) भिन्न विक्रेते उत्पादनाची विक्री करतो.

क) मुक्त प्रवेश व निर्गमन ड) या बाजारात लक्षणीय अनिश्चितता असते.

पर्याय : १) अ,ब २) अ,ब,क ३) ब,क ४) अ,ड

उत्तर :  ४) अ,ड

१२. दीर्घ काळाच्या बाजाराची वैशिष्टे

अ) उत्पादन घटक आणि खर्च बदलू शकतात

ब) दीर्घ काळात उद्योगसंस्थाना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे शक्य होते.

क) हा कालावधी पाच वर्षापेक्षा जास्त असतो.

ड) वस्तूचा पुरवठा वाढविता येत नाही.

पर्याय : १) अ,क,ड २) अ,ब ३) ब,क,ड ४) अ,ब,क,ड

उत्तर : २) अ,ब

१३. निर्देशांकाची वैशिष्टे

अ) आर्थिक धोरण ठरविण्यासाठी याचा वापर होतो.

ब) आर्थिक माहिती वास्तव स्वरुपात सादर करण्यास मदत होते.

क) निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे.

ड) निर्देशांक हे सरासरी काढण्याचे विशिष्ट साधन आहे.

पर्याय : १) क,ड २) अ,ब ३) ब,क,ड ४) अ,ब,क,ड

उत्तर : १) क,ड

१४. भारान्वित निर्देशांकाशी संबंधित विधाने

अ) या पद्धतीत विविध वस्तूंना योग्यभार देण्यात येतो.

ब) यात समुहातील वस्तूंना सापेक्ष महत्त्व दिले जाते.

क) यामध्ये संख्या भारांश म्हणून वापरली जाते.

ड) लासपेअर किंमत निर्देशांक व पाश्चे निर्देशांक या दोन पद्धतीचा वापर भारान्वित निर्देशांक तयार करण्यासाठी केला जातो.

पर्याय : १) अ,क,ड २) अ,ब,क ३) ब,क,ड ४) अ,ब,क,ड

उत्तर : ४) अ,ब,क,ड

१५. उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाच्या दक्षता

अ) दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य मोजते.

ब) अप्रत्यक्ष कराची रक्कम वगळावी

क) काही वस्तूंसाठी शासनाने दिलेली अनुदानाची रक्कम मोजावी

ड) जुन्या वस्तूंची खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जावी

पर्याय : १) फक्त अ २) अ,ब,क ३) ब,क,ड ४) अ,क,ड

उत्तर : २) अ,ब,क 

१६. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या व्यवहारिक अडचणी

अ) बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न

ब) दुहेरी गणनेची समस्या  

क) अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी

ड) मालाच्या साठ्याचे मूल्य

पर्याय : १) अ,क  २) अ,ब,क ३) ब,क,ड ४) अ,क,ड

उत्तर : ३) ब, क, ड 

१७. कराची महत्वाची वैशिष्टे

अ) कर हा शासनाला स्वेच्छेने द्यावयाचा असतो.

ब) ज्या नागरिकावर कर लागू होतो त्यांनी तो देणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे.

क) कर उत्पन्न मालमत्ता किंवा वस्तू व सेवांवर लागू केला जातो.

ड) कराच्या मोबदल्यात करदात्याला शासनाकडून भेट व प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार असतो.

पर्याय : १) अ,ड २) ब,क ३) ब,क,ड ४) अ,क,ड

उत्तर :  २) ब,क

१८. करेत्तर उत्पन्नाचे स्त्रोत

अ) विशेष अधिभार       ब) दंड व दंडात्मक रक्कमा

क) वस्तू व सेवा कर     ड) भेटी, अनुदाने, देणग्या

पर्याय : १) अ,ब,ड २) अ,ब,क ३) ब,क,ड ४) अ,क,ड

उत्तर : १) अ,ब,ड

१९. नाणे बाजारातील संघटित क्षेत्र

अ) भारतीय रिझर्व्ह बँक   ब) व्यापारी बँका

क) सहकारी बँका         ड) स्थानिक बँकर्स

पर्याय : १) अ,ब,ड २) अ,ब,क ३) ब,क,ड ४) अ,क,ड

उत्तर : २) अ,ब,क

20. व्यापारी बँकांचे वर्गीकरण

अ) सार्वजनिक क्षेत्रातील बँक    ब) खाजगी क्षेत्रातील बँका

क) विदेशी बँका              ड) मध्यवर्ती बँका 

पर्याय : १) फक्त अ  २) अ,ब,क ३) ब,क,ड ४) अ,क,ड

उत्तर : २) अ,ब,क

21. भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची वैशिष्टे

अ) स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा

ब) व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ

क) श्रम विभागणी आणि विशेषीकरण

ड) किंमत पातळीतील स्थेर्य

पर्याय : १) अ,ड २) अ,ब ३) ब,क  ४) क,ड 

उत्तर : २) अ,ब

२२. व्यापारतोल संबंधित चुकीची विधाने

अ) व्यापारतोलाला आंतरराष्ट्रीय व्यापारतोल असेही म्हणतात

ब) निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला अनुकूल व्यापारतोल असे म्हणतात

क) जर आयात मूल्य निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला प्रतिकूल व्यापारतोल असे म्हणतात.

ड) व्यापातोलाचा संबंध दृश्य वस्तूंच्या आयात निर्यात मूल्याशी होतो.

पर्याय : १) फक्त अ २) फक्त ड ३) ब,क,ड ४) अ,ब,क

उत्तर : २) फक्त ड

प्रश्न २ सहसंबंध पूर्ण करा.

१. सूक्ष्म अर्थशास्त्र : मायक्रोस :: स्थूल अर्थशास्त्र : ________

उत्तर : मॅक्रोस

२. सर्व साधारण समतोल : स्थूल अर्थशास्त्र :: ___ : सूक्ष्म अर्थशास्त्र 

उत्तर : आंशिक समतोल  

३. मातीपासून खेळणी : _____ :: लोकरीचे कपडे : स्थल उपयोगिता

उत्तर : रूप उपयोगिता

४. सर्व नगांच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता : एकूण उपयोगिता :: वाढीव वस्तूच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता : ___________

उत्तर : सीमांत उपयोगिता

५. मागणी वक्र : ________ :: पुरवठा वक्र : वर जाणारा

उत्तर : खाली येणारा

६. चहा आणि कॉफी : ________ :: वीज : संमिश्र मागणी

उत्तर : पर्यायी मागणी  

७. जास्त लवचिक मागणी : ED > १ :: कमी लवचिक मागणी : _________

उत्तर : ED < १

८. तीव्र उताराचा मागणी वक्र : कमी लवचिक मागणी  :: पसरट मागणी वक्र : ___________

उत्तर : अधिक लवचीक मागणी

९. एकूण खर्च : एकूण स्थिर खर्च + बदलता खर्च :: सरासरी खर्च : ___________

उत्तर :  एकूण खर्च

         _________________________

         एकूण नगसंख्या

१०. पुरवठ्याचा विस्तार : किंमत वाढ :: पुरवठ्याचा संकोच : _____

उत्तर : किंमत घट

११. पूर्ण स्पर्धा : मुक्त प्रवेश व निर्गमन :: ____ : प्रवेशावर निर्बंध

उत्तर : मक्तेदारी

१२. मक्तेदारी : मुल्यभेद :: ______ : वस्तू भेद

उत्तर : मक्तेदारीयुक्त स्पर्धा

१३. मूळ वर्ष किंमत : _____ :: चालू वर्ष किंमत : P1

उत्तर : Po

१४. लासपेअरचा निर्देशांक : ________ :: पाश्चेचा निर्देशांक : चालू वर्षाचे परिमाण

उत्तर : मूळ वर्षाचे परिणाम

१५. ________ : उपभोग खर्च + गुंतवणूक खर्च + सरकारी खर्च +(निर्यात - आयात) :: स्थूल राष्ट्रीय उत्पादन : उपभोग खर्च + गुंतवणूक खर्च + सरकारी खर्च +(निर्यात - आयात) + (निव्वळ येणी – देणी)

उत्तर : स्थूल देशांतर्गत उत्पादन

१६. उत्पादन पद्धत : ______ :: उत्पन्न पद्धत : घटक खर्चानुसार पद्धत

उत्तर : मालसाठा पद्धत

१७. _________ : परकीय आक्रमणापासून संरक्षण :: ऐच्छिक कार्ये : सामाजिक सुरक्षा योजनांची तरतूद

उत्तर : सक्तीचे कार्ये

१८. उत्पन्न कर : प्रत्यक्ष कर :: वस्तू व सेवा कर : ______

उत्तर : अप्रत्यक्ष कर

१९. ________ : व्यापारी बँका :: पत नियंत्रण : मध्यवर्ती बँक

उत्तर :  पतनिर्मिती  

२०. प्राथमिक बाजार : ________ :: दुय्यम बाजार : जुने रोखे

उत्तर : नवीन भांडवल

२१. दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी : _______ ::  दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची विक्री : निर्यात

उत्तर : आयात

२२. निर्यात मूल्य > आयात मूल्य : अनुकूल व्यापारतोल :: आयात मूल्य > निर्यात मूल्य : ________

उत्तर : प्रतिकूल व्यापारतोल

प्रश्न ३. आर्थिक पारिभाषिक शब्द :

१. अर्थव्यवस्थेची अशी शाखा जी अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे.

उत्तर :  सूक्ष्म अर्थशास्त्र  

२. अर्थव्यवस्थेतील सद्य स्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किंमतीची सरासरी

उत्तर : सर्वसाधारण किंमत पातळी

३. वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते.

उत्तर : स्वामित्व उपयोगिता

४. वस्तूंच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितेची बेरीज

उत्तर :  एकूण उपयोगिता  

५. विशिष्ट काळात विशिष्ट किंमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी

उत्तर : बाजार मागणी

६. एका वस्तूंची मागणी जी अनेक उपयोगासाठी केली जाते.

उत्तर : संयुक्त मागणी

७. उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल.

उत्तर : मागणीची उत्पन्न लवचिकता

८. किंमतीत अल्प किंवा जास्त बदल न होता मागणीत अनंत होणारा बदल.

उत्तर : अनंत लवचीक मागणी

९. इतर घटक स्थिर असताना किंमतीत वाढ झाल्यास पुरवठा देखील वाढतो.

उत्तर : पुरवठ्यातील विस्तार

१०. एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर खर्चात झालेली निव्वळ वाढ.

उत्तर : सीमांत खर्च

११. बाजाराचा असा प्रकार की ज्यात स्पर्धायुक्त बाजाराची सर्व वैशिष्टे आढळत नाहीत तर काही वैशिष्टे आढळतात.

उत्तर : अपूर्ण स्पर्धा

१२. एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय.

उत्तर : मक्तेदारीयुक्त स्पर्धा

१३. अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजणारा निर्देशांक.

 उत्तर : संख्यात्मक निर्देशांक  

१४. संस्थांची अशी शृंखला कि जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते.

उत्तर : निर्देशांक

१५. देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य.

उत्तर : स्थूल देशांतर्गत मूल्य

१६. उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामुग्रीची होणारी झीज. 

उत्तर : घसारा

१७. वस्तू व सेवांवर लागू केला जाणारा कर.

उत्तर : जीएसटी (वस्तू व सेवा कर)

१८. सरकारचे सार्वजनिक खर्च व सार्वजनिक उत्पन्नाशी निगडीत असणारे धोरण.

उत्तर : सरकारी अंदाजपत्रक

१९. ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या ठेवी.

उत्तर : मुदती ठेवी

२०. पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करून आर्हिक विकासाची गती वाढविण्यासाठी मध्यवर्ती बँकेद्वारे लागू केलेले धोरण.

उत्तर : मौद्रिक धोरण

२१. एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी.

उत्तर : आयात व्यापार

२२. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी.

उत्तर : व्यवहारतोल

प्रश्न ४. विसंगत शब्द ओळखा :

१) सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्टे : किंमत सिद्धांत, विभाजन पद्धत, मर्यादित व्याप्ती, राशी पद्धत

उत्तर : राशी पद्धत

२) स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती : उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत

उत्तर : उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत

३) घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद : कंजूष व्यक्ती, छंद, व्यसन, सट्टेबाजी

उत्तर : सट्टेबाजी

४) उपयोगीतेचे प्रकार : एकूण उपयोगिता, काल उपयोगिता, स्वामित्व उपयोगिता, सेवा उपयोगिता

उत्तर : एकूण उपयोगिता

५) मागणी सिद्धांताची गृहीतके : स्थिर उत्पन्न पातळी, कर धोरणात बदल नाही, लोकसंख्येच्या आकारमानात बदल, संख्यात्मक मापन  

उत्तर : संख्यात्मक मापन

६) मागणीचे प्रकार : वैयक्तिक मागणी, प्रत्यक्ष मागणी, स्पर्धात्मक मागणी, पूरक मागणी

उत्तर : वैयक्तिक मागणी

७) मागणीच्या लवचीकतेचे प्रकार : एकक लवचीक, उत्पन्न लवचीक,  छेदक लवचीक, किंमत लवचीक

उत्तर : एकक लवचीक

८)  मागणीची किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धती : गुणोत्तर पद्धत, एकूण खर्च पद्धत, उत्पन्न पद्धत, भूमिती पद्धत

उत्तर : उत्पन्न पद्धत

९) पुरवठा सिद्धांताचे अपवाद : रोख रक्कमेची तीव्र गरज, नाशवंत वस्तू, कृषी उत्पादने, प्रतिष्टेच्या वस्तू

उत्तर : प्रतिष्टेच्या वस्तू

१०) खर्च संकल्पना : एकूण खर्च, सरासरी खर्च, सीमांत खर्च, उत्पादन खर्च

उत्तर : उत्पादन खर्च

११) स्थळानुसार बाजार : स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, दीर्घकाळ बाजार

उत्तर : दीर्घकाळ बाजार

१२) विक्री खर्च : दूरदर्शन प्रसारणाचा खर्च, साठेबाजी, प्रदर्शन, फलक जाहिरात

उत्तर : साठेबाजी  

१३) निर्देशांकाचे प्रकार : संख्यात्मक निर्देशांक, किंमत निर्देशांक, साधा निर्देशांक, मूल्य निर्देशांक

उत्तर : साधा निर्देशांक

१४) निर्देशांक रचनेच्या पायऱ्या : वस्तूंची निवड, मूळ वर्षाची निवड, खर्चाची निवड, वस्तूंच्या किंमतीची निवड.

उत्तर : खर्चाची निवड

१५) राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना : स्थूल देशांतर्गत उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, आयुर्विमा महामंडळ, स्थूल राष्ट्रीय उत्पादन

उत्तर : आयुर्विमा महामंडळ

१६) राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी : दुहेरी गणनेची समस्या, अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी, बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न, घसारा

उत्तर : बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न

१७) करेत्तर उत्पन्न : विशेष अधिभार, विशेष कर, वस्तू व सेवा कर, शुल्क

उत्तर : वस्तू व सेवा कर

१८) सरकारची ऐच्छिक कार्ये : शिक्षण व आरोग्य सेवांची तरतूद, सामाजिक सुरक्षा उपाय, परकीय आक्रमणापासून संरक्षण, कल्याणकारी उपाय

उत्तर : परकीय आक्रमणापासून संरक्षण

१९) संघटित क्षेत्र : सहकारी बँका, व्यापारी बँका, सावकार, भारतीय रिझर्व्ह बँक

उत्तर : सावकार

२०) अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ : स्थानिक बँकर्स, चिटफंड, निधी, कर्ज कंपन्या

उत्तर :  स्थानिक बँकर्स

२१) विदेशी व्यापाराचे प्रकार : आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार, राष्ट्रीय व्यापार

उत्तर :  राष्ट्रीय व्यापार

२२) नवीन बंदरांचा विकास : कांडला, कोचीन नावाशेवा, मुंबई

उत्तर : मुंबई

प्रश्न ५. विधाने पूर्ण करा :  

१) आर्थिक कल्याणाचे सिद्धांत प्रामुख्याने _______ .

अ) साधनसामुग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे.

ब) उत्पादन घटकांशी संबंधित आहे.

क) वस्तूच्या किंमतनिश्चीतीशी संबंधित आहे.

ड) उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेशी संबंधित आहे.

उत्तर : साधनसामुग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. 

२) स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची शाखा ________ .

अ) अंशतः अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते.

ब) संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते.

क) मिश्र अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते.

ड) राजकीय अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते.

उत्तर : संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते.

३) ज्या नगाला सीमांत उपयोगिता व किंमत समान असतात त्या नगाला ___

अ) विक्रेत्याचा समतोल म्हणतात.

ब) उपभोक्त्याचा समतोल म्हणतात.

क) आंशिक समतोल म्हणतात.

ड) सर्वसाधारण समतोल म्हणतात.

उत्तर : उपभोक्त्याचा समतोल म्हणतात.

४) एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्या संबंधामध्ये सीमांत उपयोगिता जेंव्हा ऋण होते, तेंव्हा एकूण उपयोगिता _______

अ) वाढते      ब) स्थिर राहते      क) कमी होते   ड) शून्य होते

उत्तर : कमी होते

५) एका वस्तूची मागणी अनेक उपयोगासाठी केली जाते तेव्हा त्यास ______

अ) समिश्र मागणी ब) प्रत्यक्ष मागणी क) पूरक मागणी ड) परोक्ष मागणी

उत्तर : समिश्र मागणी

६) मागणीचा मागणी ______

अ) अॅडम स्मिथ यांनी मांडला.       ब) डॉ. आल्फ्रेड मार्शल यांनी मांडला

क) रॉबिन्सन यांनी मांडला          ड) केन्स यांनी मांडला

उत्तर : डॉ. आल्फ्रेड मार्शल यांनी मांडला

७) मागणी वक्र जेव्हा ‘य’ अक्षास समांतर असतो तेव्हा त्याला ______

अ) संपूर्ण लवचीक मागणी म्हणतात.

ब) संपूर्ण अलवचीक मागणी म्हणतात.

क) जास्त लवचीक मागणी म्हणतात.

ड) कमी लवचीक मागणी म्हणतात.

उत्तर : संपूर्ण अलवचीक मागणी म्हणतात.

८) Ed = 0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू ________

अ) चैनीच्या असतात.     ब) सर्वसाधारण असतात.

क) अत्यावश्यक असतात.  ड) सुखसोयीच्या असतात.

उत्तर : अत्यावश्यक असतात.

९) पुरवठा वक्रावर खालच्या दिशेस सरकणारा वक्र ________

अ) पुरवठ्याचा संकोच दाखवितो.

ब) पुरवठ्याचा विस्तार दाखवितो.

क) पुरवठ्यातील घट दाखवितो.

ड) पुरवठ्यातील वाढ दाखवितो.

उत्तर : पुरवठ्याचा संकोच दाखवितो.

१०) एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे ______

अ) सरासरी खर्च     ब) सीमांत खर्च

क) एकूण खर्च      ड) बदलता खर्च

उत्तर : सीमांत खर्च

११) पूर्णस्पर्धेत वस्तूची किंमत मागणी व पुरवठा यांच्या आंतरक्रियेतून निश्चित होते ती _______

अ) बाजार किंमत        ब) साधारण किंमत

क) अस्थिर किंमत       ड) समतोल किंमत

उत्तर : समतोल किंमत

१२) वस्तुभेद हे या स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्टे आहे _______

अ) पूर्णस्पर्धा            ब) मक्तेदारी

क) मक्तेदारीयुक्त स्पर्धा   ड) अल्पाधिकार  

उत्तर : मक्तेदारीयुक्त स्पर्धा

१३) निर्देशांक हा मूलतः या पातळीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता _______

अ) संख्यात्मक पातळी    ब) किंमत पातळी

क) उत्पादन पातळी       ड) औद्योगिक पातळी

उत्तर : किंमत पातळी

१४) एका चलाच्या साहय्याने मोजला जाणारा निर्देशांक _______

अ) समिश्र निर्देशांक     ब) दोन स्तरीय निर्देशांक

क) एकीकृत निर्देशांक     ड) संयुक्त निर्देशांक

उत्तर : एकीकृत निर्देशांक

१५) भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर केला जातो   ________

अ) उत्पादन पद्धती       ब) उत्पन्न पद्धती

क) खर्च पद्धती          ड) उत्पादन व उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण

उत्तर : उत्पादन व उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण

१६) निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत _______

अ) स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा मूल्य वजा

ब) स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा मूल्य वजा

क) स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा मूल्य समाविष्ट 

ड) स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा मूल्य समाविष्ट

उत्तर : स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा मूल्य वजा

१७) जेंव्हा सरकार देशातील नागरिक बँका मध्यवर्ती बँक इत्यादीकडून कर्ज घेते तेंव्हा ते ______

अ) बहिर्गत कर्ज     ब) अंतर्गत कर्ज    

क) सार्वजनिक कर्ज  ड) सरकारचे कर्ज

उत्तर :  अंतर्गत कर्ज

१८) राज्य वित्तीय धोरण हे  ________

अ) मध्यवर्ती बँक राबविते

ब) रिझर्व्ह बँक राबविते

क) सरकार राबविते

ड) व्यापारी बँक राबविते

उत्तर : सरकार राबविते

१९) भांडवल बाजार हा ______

अ) कमी मुदतीच्या निधीचा बाजार होय

ब) दीर्घ मुदतीच्या निधीचा बाजार होय

क) तरलता व्यवस्थापनाचा बाजार होय

ड) स्थानिक बँकर्सचा बाजार होय

उत्तर : दीर्घ मुदतीच्या निधीचा बाजार होय

२०) मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी ______

अ) निश्चित कालावधी ठेवी

ब) मुदत ठेवी

क) मागणी ठेवी

ड) आवर्ती ठेवी

उत्तर : मागणी ठेवी

२१) राष्ट्रांच्या भौगोलिक सीमारेषांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे _____

अ) विदेशी व्यापार   ब) देशांतर्गत व्यापार

क) पुनर्निर्यात व्यापार ड) निर्यात व्यापार

उत्तर : देशांतर्गत व्यापार

२२) व्यापारतोल हा ________

अ) देशांतर्गत व्यापारतोल ब) आंतरराष्ट्रीय व्यापारतोल

क) व्यवहारतोल म्हणतात ड) पद्धतशीरपणे केलेली नोंदणी

उत्तर : आंतरराष्ट्रीय व्यापारतोल

प्रश्न ६. विधान व तर्क प्रश्न :

 १) विधान (अ) : सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा उपयोग करते.

    तर्क विधान (ब) : विभाजन पद्धत म्हणजे एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास होय.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

 ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.   

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

          स्पष्टीकरण नाही.

उत्तर : विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

२) विधान (अ) : स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. .

    तर्क विधान (ब) : पण वस्तूची किंमत निश्चिती व उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचा अभ्यास असतो.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

  ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

 क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.  

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

  स्पष्टीकरण नाही.

उत्तर : विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

३) विधान (अ) : उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते.

    तर्क विधान (ब) : उपयोगीतेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

 ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.  

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

 स्पष्टीकरण नाही.

उत्तर : दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे       योग्य स्पष्टीकरण नाही.

४) विधान (अ) : सीमांत उपयोगितेचा वक्र वर जाणारा असतो.

   तर्क विधान (ब) : एखाद्या वस्तूच्या नगांचा उपयोग जसजसा वाढत जातो तसतशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत जाते.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

 ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.  

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

 स्पष्टीकरण नाही.

उत्तर : विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.

५) विधान (अ) : सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही.

   तर्क विधान (ब) : अर्थशास्त्रीयदृष्ट्या मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदीशक्तीचे पाठबळ व ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

 ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.  

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण नाही.

उत्तर : दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

६) विधान (अ) : अपवादात्मक परिस्थितीत मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो.

   तर्क विधान (ब) : अपवादात्मक परिस्थितीत वस्तूंची किंमत वाढते तेंव्हा उपभोक्ता अधिक वस्तूंची खरेदी करतो आणि किंमत कमी झाल्यावर कमी वस्तूंची खरेदी करतो.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

 ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.   

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

 स्पष्टीकरण नाही.

उत्तर : दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

७) विधान (अ) : एकक लवचीक मागणीचा वक्र हा आयताकृती परिवालायाचा असतो.

   तर्क विधान (ब) : किंमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यास एकक लवचीक मागणी असे म्हणतात.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

 ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.   

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

 स्पष्टीकरण नाही.

उत्तर : विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

८) विधान (अ) : एकूण खर्च पद्धतीमध्ये आपण मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची लवचिकता मोजू शकतो.

 तर्क विधान (ब) : एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार होय.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

 ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.   

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

 स्पष्टीकरण नाही.

उत्तर : विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.

९) विधान (अ) : साठ्याशिवाय पुरवठा असू शकत नाही.

   तर्क विधान (ब) : साठा पुरवठ्याचे स्त्रोत आहे.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

 ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.   

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण नाही.

उत्तर : दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

१०) विधान (अ) : श्रमाचा पुरवठा वक्र खाली उतरणारा असतो.

   तर्क विधान (ब) : एका विशिष्ट पातळीनंतर वेतन दर वाढल्यास श्रमाचा पुरवठा वक्र कमी होतो.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.  

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण नाही.

उत्तर : विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.

११) विधान (अ) : मक्तेदार हा किंमत कर्ता असतो.

   तर्क विधान (ब) : मक्तेदार हा स्वतःच्या मालाची किंमत निश्चित करतो त्यामुळे त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

 ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.  

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

 स्पष्टीकरण नाही.

उत्तर : दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

१२) विधान (अ) : वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.

   तर्क विधान (ब) : मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूंना जवळचे पर्याय उपलब्ध नसतात.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

 ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.   

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण नाही.

उत्तर : विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

१३) विधान (अ) : निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे.

   तर्क विधान (ब) : निर्देशांक हा मूलतः किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.  

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण नाही.

उत्तर : दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

१४) विधान (अ) : निर्देशांकाची रचना करण्यासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो.

   तर्क विधान (ब) : अंकगणितीय मध्याचा वापर करून तुलनात्मकदृष्ट्या गणना करणे सोपे असते.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.   

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण नाही.

उत्तर : दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

१५) विधान (अ) : राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तू आणि उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते.

   तर्क विधान (ब) : राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.  

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण नाही.

उत्तर : दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

१६) विधान (अ) : हस्तांतरित देण्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करावा.

   तर्क विधान (ब) : निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता, इ. सारखी हस्तांतरित देणी हा सरकारी खर्चाचा एक भाग आहे.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.   

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण नाही.

उत्तर : विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.

१७) विधान (अ) : सरकारने केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय.

   तर्क विधान (ब) : सार्वजनिक खर्चामध्ये नागरिकांचे संरक्षण, त्यांच्या सामुहिक गरजांची पूर्ती, सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च इ. चा समावेश होतो.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

 ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.   

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण नाही.

उत्तर : दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

१८) विधान (अ) : कर्ज उभारणे हे सरकारची सर्वसाधारण कृत्ती आहे.

   तर्क विधान (ब) : सरकारी खर्च सर्वसाधारण पणे सरकारी महसुलापेक्षा जास्त असतो.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.   

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण नाही.

उत्तर : दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

१९) विधान (अ) : पतनियंत्रण करणे हे व्यापारी बँकेचे महत्वाचे कार्य आहे.

   तर्क विधान (ब) : व्यापारी बँका ठेवी निर्माण करतात ठेवीतून कर्ज देतात, कर्जातून ठेवी निर्माण होतात व त्यातून पतपैशाची निर्मिती होते.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.   

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण नाही.

उत्तर :  विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे. 

२०) विधान (अ) : वायदे बाजार हा नाणे बाजाराचा महत्त्वाचा घटक आहे.

   तर्क विधान (ब) : वायदे बाजार ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये समभाग,रोखे इत्यादीचा व्यवहार होतो.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.   

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य 

स्पष्टीकरण नाही.

उत्तर : विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.

२१) विधान (अ) : व्यापार हा आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे.

   तर्क विधान (ब) : देशाच्या आर्थिक विकासात व्यापार महत्त्वाची भूमिका बजावतो.

पर्याय : अ) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.

ब) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे

क) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण आहे.   

ड) दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य

स्पष्टीकरण नाही.

उत्तर : दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ‘ब’ हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

२२) विधान (अ) : व्यापारतोलाला व्यवहारतोल असेही म्हणतात.

   तर्क विधान (ब) : व्यापारतोलाचा संबंध दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात - निर्यात मूल्यांशी येतो.

THANK YOU

Share